शेफ नीलेश लिमये

सॉम- टॉम सॅलड हे मूळचं थाई सॅलड आहे. बँकॉकमध्ये कुठेही फिरलात तर तुम्हाला हे सॅलड प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये किंवा रस्त्यावरच्या लहान स्टॉल्समध्येही मिळेल. तिथे यासोबत एक फिश सॉस त्यामध्ये घालतात आणि या सॅलडची चव अप्रतिम लागते. आपणही अशा प्रकारे करू शकतो. त्यासाठी व्हिनेगर आणि सोया सॉसच्या मिश्रणात रात्रभर सुकट भिजवून ते वापरू शकता. शाकाहारी असाल तर चिंचेची चटणी वापरता येते. मीही तीच वापरली आहे.

do patti
अळणी रंजकता
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
Bhakri chaat recipe Video
आंबट-गोड चटपटीत चाट खायला आवडतं? एकदा भाकरी चाट खाऊन तर पाहा
How To Make Coconut Jaggery Barfi
Coconut Jaggery Barfi : यंदा दिवाळीत बनवा तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी? नक्की ट्राय करा ‘ही’ रेसिपी; अगदी कमी मेहनत लागेल
How To Make Diwali special Oreo Fudge Balls
Diwali Special Laddoo : यंदा दिवाळीला फक्त २ पदार्थ वापरून करा असा लाडू ; गोड काय बनवायचं याचं टेन्शनचं होईल दूर
Pokala Bhaji recipe in marathi how to make ranbhaji Pokala Bhaji poklyachi Bhaji recipe in marathi
पोकळ्याची भाजी आणि देठी; पौष्टिक अन् चवदार भाजी; ही घ्या सोपी रेसिपी
Kanda Zunka Recipe
Kanda Zunka Recipe : झणझणीत कांद्याचा झुणका असा बनवा, सोपी रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO
kachya papayachi sukhi bhaji recipe in marathi bhaji recipe
कच्ची पपई खाल्याने आरोग्याला होतील चमत्कारी फायदे; कच्च्या पपईची भाजी गृहिणींनो एकदा नक्की ट्राय करा

साहित्य

* १ छोटय़ा आकाराची कच्ची पपई

ड्रेसिंगसाठी – १ टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, बेसिल, १ चमचा शेंगदाणे, १ चमचा तांदूळ, १ चमचा सोया सॉस, १ चमचा चिंचेची चटणी, १ चमचा चिली सॉस, मीठ आणि मिरपूड

कृती :

कच्ची पपई सोलून त्याच्या बारीक चकत्या करून घ्या. त्याचेही लांबट पातळ काप काढा. पाण्यात भिजवून फ्रिजमध्ये ठेवा.

आता ड्रेसिंगच्या तयारीला लागू. एका वाटीत टोमॅटो कापून ठेवा. त्यात चिंचेची चटणी, सोया सॉस, चिली सॉस, मीठ, मिरपूड, साखर घाला आणि हे मिश्रण ठेचून एकजीव करा. हे झालं ड्रेसिंग तयार. आता यामध्ये चिरलेली पपई एकत्र करा. आणि बाउलमध्ये पेश करा.

सजावटीसाठी – तांदूळ मंद आचेवर भाजून घ्या. हे अगदी छान भाजले गेले पाहिजेत तरच ते कुरकुरीत लागतात. हे तांदूळ त्या सॅलडवर शिंपडून घ्या. तसंच त्यावर शेंगदाणे भरडून वरून घाला. पुदिना, कोथिंबीर आणि बेसिल सॅलडवर पेरा. हे आगळ्यावेगळ्या प्रकारचं सॅलड तयार झालं.