कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतात झणझणीत पदार्थ. म्हणूनच आज आम्ही घेऊन आलो आहोत, झणझणीत ढाबा स्टाईल कोल्हापूरी अख्खा मसूर. काही मिनिटात ही रेसिपी तयार तर होतेच, शिवाय करायलाही सोपी आहे. जर आपण तिखट खाण्याचे शौकीन असाल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करा.
कोल्हापूरी अख्खा मसूर साहित्य
- १/२ वाटी अख्खा मसूर
- कोथिंबीर बारीक चिरलेली
- ३ ते ४ लसुन पाकळया
- तुकडा आल्याचा
- १/२ चमचा जीरे
- ३ चमचे खोबरे (किसलेले)
- २ ते ३ चमचे तेल
- १/२ चमचा मोहरी
- २ कांदे बारीक (चिरलेला)
- १ टोमॅटो
- १/४ चमचा हळद
- १ चमचा च लाल तिखट
- ३ चमचा घरगुती मसाला किंवा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
- २ लवंगा १ तमालपत्र १ तुकडा दालचिनीचा
- चवीनुसार मीठ
- बटर, तेल आणि तूप
- पाणी
कोल्हापूरी अख्खा मसूर कृती
स्टेप १
मसूर रात्रभर भीजत घालावे व सकाळी पाण्याने स्वच्छ धुवुन घ्यावे. कुकरमध्ये पाणी घालून ३ ते ४ शिटया काढून शिजवुन घ्या. आता मिक्सरच्या भांडयामध्ये चिरलेली कोथिंबीर, लसुन, आलं, किसलेलं खोबरे, जीरे आणि टोमॅटो घालावे आणि बारीक मसाला वाटुन घ्यावा.
स्टेप २
आता एका कढईत तेल आणि तूप गरम करावे. त्यात मोहरी, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र घालावे आणि छान तडतडू दया. आता त्यात कांदा घालावा आणि छान सोनेरी होइपर्यंत परतून घ्यावा. आता त्यात वाटलेला मसाला घालावा आणि तो छान परतुन घ्यावा. मसाला छान परतुन झाला की त्यात हळद, लाल तिखट आणि घरगुती मसाला घालावा आणि व्यवस्थित एकत्र एकजीव करुन घ्यावे.
स्टेप ३
आता या मिश्रणात शिजवलेली मसूर डाळ घाला. सर्व नीट मिक्स करून या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घाला. हा रस्सा फार पातळ न करता दाटसर ठेवावा. आणि चवीनुसार मीठ आणि बटर घालावे. आणि एक उकळी येईपर्यंत शिजवुन घ्यावे. अख्खा मसूरची भाजी तयार आहे.
हेही वाचा >> अस्सल सातारा स्पेशल काळ्या घेवड्याची आमटी; गावाकडं आवडीनं खाल्ली जाणारी रेसिपी लगेच नोट करा
स्टेप ४
बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बटर गारनिशिंगला घालावे. गरमागरम पोळी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी.