आपल्या सर्वांच्या घरात ढोबळी मिरची ही असतेच असते. त्यातून आपल्यालाही विविध पदार्थांमध्ये सर्व्ह करण्यासाठी ढोबळी मिरची ही लागतेच.शिमला मिरचीचा जास्त वापर हे चायनीज आणि कॉन्टिनेंटल डिशेस मध्ये केला जातो. भाजी खायचं म्हटलं तर फार कमी लोकांना आवडते. सिमला मिरचीसोबत आलू मिक्स केले तर ती भाजी थोडीफार खाल्ली जाते. पण तुम्ही त्याला थोडं ट्विस्ट देऊ शकता. आज आम्ही तुमच्यासाठी शिमला मिरचीची भजी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुयात कशी बनवायची ढोबळी मिरचीची भजी. पावसाळ्यात गरमागरम कुरकुरीत ढोबळी मिरचीचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ढोबळी मिरचीची भजी साहित्य –

  • ढोबळी मिरची
  • 1 वाटी बेसन पीठ
  • 1 चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा हळद
  • अर्धा चमचा ओवा
  • चिमटीभर सोडा
  • तळण्यासाठी तेल

ढोबळी मिरचीची भजी कृती –

शिमला मिरची बनवण्यासाठी सर्वप्रथम मिरची धुवून त्याचे देठ आणि बिया काढून ते आतून पोकळ करून घ्या. आता एक पॅन मध्ये तेल घ्या. ते गरम झाल्यावर त्यात जिरे, हिंग टाका. नंतर कांदा टाकून ते ब्राऊनिश होऊ द्या. त्यानंतर उकळलेले बटाटे टाकून मिक्स करा. आता यात लाल तिखट, हळद, धने पूड, गरम मसाला, आचमूर पावडर आणि मीठ टाका. चांगले मिक्स करून थोडा वेळ शिजू द्या. तुमचे स्टफिंग रेडी झाले. आता शिमला मिरची घेऊन त्यात हे स्टफिंग वरपर्यंत भरा. आता पुन्हा पॅनमध्ये तेल घ्या आणि गरम करा. यात स्टफ केलेल्या शिमला मिरची ठेवा.

हेही वाचा – Bread pakora: क्रिस्पी ब्रेड पकोडा; पावसाळ्यात संध्याकाळी बनवा गरमा-गरम नाश्ता

ही ढोबळी मिरचीची भजी नक्की ट्राय करा आणि कशी होते हे आम्हाला कळवा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhobli mirchi bhaji in marathi monsson recipe in marathi bhaji recipe easy way marathi recipes srk