Dhokla-e-Salsa Recipe in Marathi: अनेकदा घरी नाश्त्याला काय बनवावं हे कळतंच नाही. नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळाही येतो. तसंच सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ ढोकळा अनेकदा घरी बनवला जातो. पण तुम्ही कधी ढोकळा-इ-साल्सा घरी करून पाहिला आहे का? अगदी सोप्या पद्धतीत काही मिनिटांतच बनणारी ही रेसिपी कशी बनवायची ते आज आपण जाणून घेणार आहोत.

साहित्य

  • ढोकळा बनविण्यासाठी साहित्य
  • १५० ग्राम रवा
  • ५० ग्राम बेसन
  • 1/4 कप दही
  • २/३ टेबलस्पून हिरवी चटणी
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • 1/2 टेबलस्पून तेल
  • सालसा बनविण्यासाठी साहित्य..
  • 1 कांदा बारीक चिरलेला
  • 1 टमाटर बारीक चिरलेला
  • 1 शिमला मिर्ची बारीक चिरलेली
  • ४/५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • थोडीशी कोथिंबीर
  • 1 कप स्वीट कॉर्न चे दाणे
  • 1 टेबलस्पून लिंबू रस
  • 1 गाजर बारीक चिरलेला
  • 1 टिस्पुन ब्लॅक पेपर पावडर
  • 1 टिस्पुन ओरेगानो
  • 1 टिस्पुन चिली फ्लेक्स
  • 1/2 टेबलस्पून टोमॅटो केचप
  • चवीनुसार मीठ
  • थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली

कृती

ढोकळा बनविण्यासाठी आधी रवा बेसन चाळून घ्या.

आता यामध्ये हिरवी चटणी,(चार ते पाच मिरच्या कोथिंबीर व आलं घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणे) दही, मीठ व आवश्यकतेनुसार पाणी घालून ढोकळ्या साठी बॅटर बनवून घ्या. व पाच मिनिटे बॅटर तसेच ठेवून द्या.

ढोकळा पात्रात पाणी घालून, गॅस वर ठेवा. प्लेटला तेल लावून ग्रीस करून घ्या. यामध्ये आपण भिजवलेले बॅटर घालून, ढोकळा स्टॅंड वर ठेवून, ढोकळ्या पात्रात ठेवा. झाकण बंद करून दहा ते बारा मिनिटं गॅस वरती होऊ द्या.

नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आलेली आहे.