Dhokla Idli Recipe in Marathi: ढोकळा इडली हे दोन्ही पदार्थ सगळ्यांच्या आवडीचे. पण ते आता वेगवेगळे बनवण्यापेक्षा एकत्र करून तुमच्या नाश्त्याची चव तुम्ही वाढवू शकता. नेहमी काहितरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गृहिणींसाठी ही रेसिपी अगदी सोयीस्कर ठरेल. चला तर मग जाणून घेऊया ढोकळा – इडलीची रेसिपी…
साहित्य
- १.५ वाटी बेसन
- 3 टेबलस्पून रवा
- 1 टीस्पून हिंग
- 1 टीस्पून हळद
- 1 मिरचीचे तुकडे
- 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट
- 1 टेबलस्पून साखर
- 1 टेबलस्पून लिंबाचा रस
- 1 टेबलस्पून तेल
- 1 टीस्पून बेकींग सोडा/ फ्रूट सॉल्ट
- चवीनुसार मीठ
- 1 वाटी पाणी
फोडणीसाठी - 3 टेबलस्पून तेल
- 1 टीस्पून मोहरी
- 1 टीस्पून जीरे
- 1 टीस्पून हिंग
- 4-5 कडिपत्ता
- 2-3 मिरच्या
- 2 टेबलस्पून तीळ
- 1 टेबलस्पून लिंबाचा रस
- 1 टेबलस्पून साखर
- 1/2 वाटी पाणी
कृती
प्रथम वरील सांगितल्याप्रमाणे फोडणीचे साहित्य सोडून सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे व १/२ तास बाजूला ठेऊन द्यावे.
१/२ तासाने बेकींग सोडा/ फ्रूट सॉल्ट घालून पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. इडली पात्रात पाणी गरम करण्यास ठेवावे व तेल लाऊन त्यात तयार मिश्रण घालून झाकण लावून घ्यावे. १५-२० मिनिटे मध्यम गॅसवर ठेवावे.
ढोकळा – इडली तयार आहे.
फोडणीची तयारी – तेल गरम करून घ्या व त्यात मोहरी, जीरे,हिंग, कडिपत्ता, तीळ, मिरच्या,साखर,पाणी, लिंबू व मीठ क्रमाने घालून मिक्स करावे. फोडणी तयार आहे.
ढोकळा – इडली वर फोडणी घालून ओलं खोबरं भुरभुरून सर्व्ह करावे.
नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आलेली आहे.