डायबिटीजमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने त्रास बळावतो म्हणूनच या रुग्णांना शक्य तितकं साखर वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जातो . पण काही वेळेस एखादा गोड पदार्थ खाण्याची आपलीही इच्छा होऊ शकते, हो ना? अशावेळी बंधन घातल्यास मनाची आणखी चलबिचल होऊ शकते. म्हणूनच आज आपण खास डायबिटीजच्या रुग्णांसाठी टेस्टी लाडू कसा बनवायचा हे पाहणार आहोत. एरवी डायबिटीजचा लाडू म्हणजे मेथी, अळीव असे पदार्थ असा एक समज असतो पण अजिबात कडू नसलेला,विना मेथी बनवलेला हा हिरव्या मुगाचे लाडू नक्कीच आवडेल. चला तर पाहुयात ही रेसिपी..
हिरव्या मुगाचे लाडू साहित्य
एक वाटी हिरवे मुग पाव
वाटी पिठी साखर (शक्यतो ताजीच मिक्सरला दळून घ्यावी अशा ताज्या पिठी साखरेचे लाडू खमंग लागतात.)
पाव वाटी तूप (आवडी नुसार सुकामेवा)
हिरव्या मुगाचे लाडू कृती
हिरवे मुग निवडून स्वच्छ धुवून घ्यावे. पातळ फडक्यावर तास भर सुकत ठेवावे. मूग सुकले की कढईत मंद आचेवर खमंग भाजून घ्यावे. मूग भाजायला साधारणत: अर्धा तास लागतो.
मूग चांगले भाजले गेल्यावर गॅस बंद करावा आणि हे मूग पूर्णपणे गार करून घ्यावे.गार झाल्यावर मिक्सरमधून या मुगाचे शक्य तितके बारीक पीठ करून घ्यावे.
कढईत तूप घालावे. तूप गरम झाले की मुगाचे पीठ घालावे. मध्यम आचेवर पीठ भाजत रहावे. भाजताना ते सतत हलवत राहावे नाहीतर पीठ कढईत करपायची शक्यता असते.
पीठ भाजले की खमंग वास येतो व पीठ कढईच्या कडा सोडू लागते. यानंतर गॅस बंद करावा.
हेही वाचा >> फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
पीठ थोडे कोमट होवू द्यावे. कोमट झाले की पीठात बारीक केलेली साखर घालावी. भाजलेल्या पिठात पिठी साखर चांगली मिसळून घ्यावी.
साखरेच्या गुठळ्या राहाता कामा नये.