नाश्ता हा नेहमीच काही खाण्याचा असायला हवा, असे नाही. तो कधी तरी खाण्यापिण्याचाही असू शकतो. गैरसमज करून घेऊ नका. मी स्मूदी, ज्यूस अशा पदार्थाविषयी बोलते आहे. तर आज खास उन्हाळ्यानिमित्त ही थंडगार स्मूदी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य – आंबा, केळे, गोड ताजे दही किंवा दूध, पाणी, सब्जा, खजूर, आवडीचा सुका मेवा. मुसली किंवा ओट्स, गुलकंद. या साहित्यामध्ये आवडीप्रमाणे आणि ज्याप्रमाणे उपलब्ध असेल त्याप्रमाणे कोणतेही फळ घेता येईल. दही किंवा दूध यापैकी एकच वापरावे.

कृती –  मुसली किंवा ओट्स सोडून बाकीचे सगळे साहित्य मिक्सरमध्ये मस्त फिरवून घ्यावे. गुलकंद घालायला विसरू नये. साखर मात्र टाळावी. झाली आपली स्मूदी तयार. त्यात ओट्स किंवा मुसली घालून खावे. थंड आणि मस्त नाश्ता तय्यार.