‘घोसाळी, पडवळ, दोडके, नाही कोणाचे लाडके’ ही ओळ घरोघरी खरी होत असते. या भाज्या क्वचितच कोणाला आवडतात. पण खायला तर हव्यातच. त्यामुळेच मग त्यासाठी हे अनोखे कटलेट.
साहित्य
आणखी वाचा
घोसाळी किंवा पडवळ किंवा दोडके, बटाटा, थोडासा भात, हळद, मीठ, तिखट, धने-जिरे पूड, चाट मसाला.
कृती
पहिल्यांदा घोसाळी किंवा पडवळ किंवा दोडके यातील जी कोणती भाजी घेणार असाल ती धुऊन घ्या. फक्त या भाज्या शक्यतो कोवळ्या असाव्यात. त्या किसून घ्या. बटाटा शिजवून घ्या. बटाटा, भात यामध्ये हा किस घालून त्यात हळद, मीठ, तिखट, धने-जिरे पूड, चाट मसाला असं सगळं घालून छान एकत्र करून घ्या. याचे छोटे छोटे पॅटिस करून तव्यावर तेलात तळून घ्या. यामध्ये आवडीप्रमाणे पिझ्झा मसाला किंवा पिझ्झा हब्र्जही घालता येतील.