भाऊबीजेला सगळ्यांच्याच घरी पाहुण्यांची लगबग असते. अशावेळी कमी वेळात काय स्वयंपाक करावा हे कळत नाही. फराळ करून आधीच दमछाक झालेली असते. पण आता चिंता करु नका, कारण आम्ही भाऊबीजसाठी काही खास नॉनव्हेज रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहत. दुपारच्या जेवणाला आपल्या लाडक्या भावासाठी हे नॉनव्हेज पदार्थ नक्की ट्राय करा. या रेसिपीनं तुमची भाऊबीज होईल एकदम खास. चला तर पाहुयात या चमचमीत रेसिपी
चला तर पाहुयात पाहिली चिकनच्या चटपटीत रेसिपी
गार्लिक चिकन साहित्य :
- १ किलो चिकन
- १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- ३ ते ४ लसूणचे कांदे
- ४०० ग्रॅम दही चिकन मसाला गरम मसाला
- हळद, कसूरी मेथी
- काश्मिरी मिर्च पावडर चवीनुसार मीठ
गार्लिक चिकन कृती :
- प्रथम चिकनला मीठ लावून स्वच्छ धुवून घ्या. लसूण बारीक चिरून घ्या.
- एका भांडयात चिकन घेऊन त्याला ४०० ग्रॅम दही, एक चमचा तेल, मीठ, बारीक चिरलेला लसूण, हळद, १ चमचा काश्मिरी मिरची पावडर लावून ३ ते ४ तास मेरिनेट करण्यास ठेवावे.
- नंतर एका पसरट कढईमध्ये तेल तापवून त्यात मॅरिनेटेड चिकन घालावे व मध्यम आचेवर झाकण ठेऊन शिजवावे.
- गॅसवरून उतरवण्याच्या १० मिनिटे अगोदर त्यात कस्तूरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा काश्मिरी मिरची पावडर, चिकन मसाला, गरम मसाला टाकून झाकण काढून ग्रेव्ही थोडी घट्ट होऊ द्या
- चिकनच्या तुकडयांना हात न लावता चमच्याने ग्रेव्ही थोडी ढवळा व गॅस बंद करा.
चिकन कटलेट साहित्य –
- ५०० ग्रॅम बॉइल्ड चिकन, उकडलेले बटाटे – तीन
- दोन ते तीन मध्यम आकाराचे चिरलेले कांदे
- बारीक चिरलेले लसूण, किसलेले आले,
- दोन ते तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्या,
- दोन चमचे मिरपूड, तीन चमचे धणे पूड
- दोन चमचे लाल तिखट, दीड चमचा चिकन मसाला,
- एक चमचा गरम मसाला, चार ते पाच हिरव्या मिरच्या
- थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, चवीनुसार मीठ
- चिमूटभर हिंग, तळण्यासाठी तेल, पाच ब्रेडचे स्लाइस, दोन अंड
चिकन कटलेट कृती –
- चिमूटभर हळद, मिरपूड आणि व्हिनेगर घालून ३-४ शिट्ट्या येईपर्यंत चिकन शिजवून घ्या. शिजलेलं चिकन एका मोठ्या बाउलमध्ये काढा. चिकन मॅश करून घ्या. दुसऱ्या बाउलमध्ये उकडलेले बटाटे मॅश करा.
- पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेलामध्ये मोहरी, बारीक चिरलेले लसूण, आले आणि कढीपत्ताही घालावा. यानंतर दोन ते तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्याही मिक्स करा. चवीनुसार मीठ घालून सर्व सामग्री नीट फ्राय करा.
- यानंतर पॅनमध्ये चिरलेले कांदे घाला. नंतर चिकन मसाला, गरम मसाला, दोन चमचे लाल तिखट आणि तीन चमचे धणे पूड घालून सर्व सामग्री नीट ढवळून घ्या.
- मसाल्यामध्ये मॅश केलेले चिकन मिक्स करा. थोडंसं चिकन स्टॉकही घाला. यानंतर पॅनमध्ये मॅश केलेले बटाटे घालून सर्व सामग्री पाच मिनिटे शिजू द्यावी.
- दुसऱ्या एका बाउलमध्ये दोन अंडी फेटून ठेवा आणि ब्रेडचा चुरा देखील तयार करा. आता मसाल्याचे लहान-लहान गोळे तयार करा. फेटलेल्या अंड्यामध्ये मसाल्याचा गोळा डिप करून ब्रेडच्या चुऱ्याने कोटिंग करा.
- यानंतर मसाल्याच्या गोळ्यांचे कटलेट तयार करून घ्या. तेलामध्ये कटलेट फ्राय करून घ्या. गरमागरम कटलेट सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.
हरियाली चिकन साहित्य :
- अर्धा किलो चिकन
- १ कप दही
- २ कांदे
- १ टोमॅटो
- १ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ कप बारीक चिरलेला पुदिना
- अर्धा कप चिरलेला पालक
- ४-५ हिरव्या मिरच्या
- २ चमचे आले-लसूण वाटलेले
- १ चमचा हळद
- २ चमचे चिकन मसाला
- अर्धा चमचा गरम मसाला
- अर्धा चमचा अख्खा गरम मसाला (१ मोठी वेलची, १ दालचिनी, ४ लवंग, २-३ तमालपत्रे)
- मीठ, तेल
हेही वाचा >> यंदा दिवाळीला घरीच बनवा मोतीचूर लाडू; नोट करा सोपी रेसिपी
हरियाली चिकन कृती :
- चिकनला हळद आणि मीठ लावून ठेवावे.
- मिक्सरमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, पालक, पुदिना वाटून त्यात दही मिसळून एकजीव वाटून घ्यावे.
- एका पातेल्यात तेल गरम करून त्यात अख्खा गरम मसाला आणि बारीक चिरलेला कांदा लालसर रंगावर परतून घ्या.
- त्यानंतर त्यात चिकन घालून परतावे. आता हे चिकन नीट शिजवून घ्यावे.
- ताटावर पाणी घालून ते ताट या पातेल्यावर ठेवून चिकन शिजवावे.
- यानंतर त्यात सर्व मसाले आणि तयार केलेले हिरवे वाटण घालावे. पुन्हा झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यावे.