फराळामध्ये लज्जत वाढवण्यासाठी लसूण शेव प्रसिद्ध आहे. या शेवची चटपटीत आणि थोडीशी तिखट चव तोंडाला फारच छान लागते. अनेक लोकांना लसून शेव विशेष आवडते. दरवर्षी फराळामध्ये लसूणी शेवचा समावेश आवर्जून करतात. पण तुम्ही कधीही लसूण शेव बनवली नसेल आणि यंदा बनवण्याची इच्छा असेल, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग पाहूया लसुण शेव बनवण्याची सोपी रेसिपी.
लसूण शेव बनवण्यासाठी साहित्य
३ कप डाळीचे पीठ
१५ ते २० लसूण पाकळ्या
२ टीस्पून जीरे
२ टीस्पून ओवा
१ टीस्पून हळद
२ कप बेसन
२ टीस्पून लाल तिखट आवडीनुसार कमीजास्त प्रमाणात वापरू शकता
चवीनुसार मीठ घालावे
तेल
लसूण शेव बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या, ओवा, काळी मिरी, हळद आणि लाल तिखट घ्या. आता त्यात एक कप पाणी घाला आणि गुळगुळीत पेस्ट बनवून घ्या.
तयार झालेली पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. आता त्यामध्ये ३ चमचे तेल, चिमूटभर हिंग आणि मीठ घाला.
सर्वकाही चांगले एकत्र करून चमच्याने फेटून घ्या. आता त्यात घेतलेले २ कप बेसन घाला आणि चमच्याने मिक्स करा.
पुढे पाणी घालून पीठ मळायला सुरुवात करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून गुळगुळीत आणि मऊ पीठ मळून घ्या.
आता चकली बनवण्याच्या साच्याला आतून तेल लावून घ्या. यामध्ये थोडे पीठ घालून साच्या व्यवस्थित बंद करा.
आता त्या साच्याच्या साहाय्याने गरम तेलात शेव पाडायला सुरुवात करा. एक मिनिटानंतर, शेव उलटा आणि दुसऱ्या बाजूला सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
हेही वाचा >> Lakshmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेला घरीच बनवा मोतीचूर लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी पेपरवर ठेवा. शेवटी, लसूण शेवचे तुकडे करा. आणि हवाबंद डब्यात भरून ठेवा.
चकलीच्या साच्यात वेगवेगळे पान असतात. त्यातील सर्वात बारीक शेवचे पान घेतल्यास शेव दिसेलही छान आणि चवही उत्तम लागेल.