Diwali faral recipe 2024: दिवाळीचा फराळ करण्याची वेळ झाली आहे. दिवाळसणाला खमंग, खुसखुशीत चकलीची आठवण सगळ्यांनाच येते. चकलीची भाजणी आणि कधीही बिघडणार नाही, अशी चकली करायची असेल तर ही कृती नक्की फॉलो करा. आधी चकलीची भाजणी कशी करायची ते पाहुयात आणि त्यानंतर त्याच भाजणीपासून चकली कशी करायची तेही पाहुयात…अनेक महिलांच्या दिवाळीसाठी बनवलेल्या चकल्या नेहमी नरम पडतात. पण आता घाबरू नका आधी ही माहिती वाचा. खाली दिलेलं भाजणीचे योग्य प्रमाण वापरून बनवा खमंग खुसखुशीत चकली. दिवाळीला सर्वाना आवडणारा पदार्थ म्हणजे चकली पण काही वेळा चकली बिघडते कारण भाजणीचे प्रमाण योग्य नसते कोणतातरी पदार्थ जास्त होतो म्हणून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत भाजणीचे योग्य प्रमाण वापरून खमंग खुसखुशीत चकलीकशी बनवायची

३ वाट्या साधे तांदूळ
दीड वाटी हरभऱ्याची डाळ
१ वाटी उडीद डाळ
अर्धी वाटी मूग डाळ
१ वाटी पोहे
पाऊण वाटी धणे
२ टेबल स्पून जिरे

How To Make Poha Chakli
Diwali Special Chakli Recipe : नेहमीच्या चकलीला द्या थोडा ट्विस्ट, यंदा दिवाळीत बनवा पोह्यांची कुरकुरीत चकली; वाचा साहित्य, कृती
Daily Horoscope 25th October in Marathi
Today’s Horoscope, 25 October : पंचांगानुसार आजचा शुभ…
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची रतन टाटांशी भेट अन् मैत्री कशी झाली? वाचा
Diwali Special Poha Chivda Patal poha chivda recipe in marathi
चिवडा नरम होतो? या ३ टिप्स वापरा शेवटपर्यंत राहील कुरकुरीत; ही सोपी रेसिपीही करा नोट
BJP leader Vasantrao Deshmukh on Jayashree Thorat
Jayashree Thorat: “माझी लाडकी बहीण म्हणायचं आणि लेकीवर भर सभेत..”, भाजपा नेत्याच्या अश्लाघ्य विधानानंतर विरोधकांचा संताप
police cbi is ani
IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल
sabudana khichdi recipe in marathi
साबुदाणा न भिजवता फक्त काही मिनिटांत झटपट बनवा साबुदाण्याची खिचडी; एकदम सोपी रेसिपी
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चकलीची भाजणी कशी करायची?

सर्वात आधी वर दिलेले सर्व धान्य स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यावीत.

सर्वप्रथम तांदूळ भाजून घ्यावेत. खूप जास्त लाल होईपर्यंत भाजू नयेत. किंचित गुलाबी रंग आला की गॅस बंद करावा.

हरभऱ्याची डाळ भाजून घ्यावी. त्यानंतर उडीद डाळ भाजून घ्यावी. साधारण लालसर रंग आला की गॅस बंद करावा.

मग मूगडाळ भाजावी. त्यानंतर पोहे भाजून घ्यावेत. पोहे भाजणं अर्ध्यावर आले असतानाच त्यात धणे टाकावेत. थोडावेळ तेही एकत्रितपणे भाजून घ्यावेत.

भाजणी थंड झाल्यानंतर या सर्व मिश्रणात २ टेबलस्पून जिरे घालून भाजणी बारीक दळून आणावी. या भाजणीत ४० ते ५० मध्यम आकाराच्या चकल्या होतात.

कुरकुरीत चकलीची रेसिपी

सुरुवातीला २ वाट्या चकलीच्या भाजणीपासून चकली करुयात. एका पातेल्यात पाऊण वाटी गरम पाणी, अर्धा टेबलस्पून तिखट, मीठ, अर्धा टेबलस्पून ओवा, १ टेबलस्पून तीळ, पाव टीस्पून हिंग, २ टीस्पून तूप टाकावे.

या पाण्याला उकळी आली की २ वाट्या चकलीची भाजणी त्यात टाकावी. गॅस बंद करून पाण्यात हे पीठ चांगले मिक्स करून घ्यावे.

त्यानंतर हे १ तासभर झाकून ठेवावे. तासाभराने पीठ घेऊन साध्या पाण्यात तो मऊसर भिजवून घ्यावा. चकली करण्याचं यंत्र म्हणजेच सोऱ्याला आतून तेल लावून घ्यावं.

त्यात हे तयार केलेलं पीठ टाकावं. मध्यम आकाराच्या चकल्या बटरपेपरवर किंवा दुधाच्या कॅरीबॅगवर करून घ्याव्यात.

हेही वाचा >> चिवडा नरम होतो? या ३ टिप्स वापरा शेवटपर्यंत राहील कुरकुरीत; ही सोपी रेसिपीही करा नोट

त्यानंतर कढईत तेल घ्यावं. भरपूर तापल्यावर गॅस मध्यम करून त्यात चकली तळून घ्यावी. दोन वाटी मिश्रणात साधारण १५ ते १६ चकल्या आरामात होतात.