दिवाळी आता काही दिवसांवर आली आहे. घरघरामध्ये दिवाळीच्या फराळाची जय्यत तयारी सुरु आहे. चिवडा, लाडू, चकली, शंकरपाळ्या, करंजी असे विविध पदार्थ दरवर्षी दिवाळीमध्ये आवर्जून तयार केले जातात. दिवाळीच्या फराळातील सर्वांचा एक आवडता पदार्थ असतो. अनेकांनी कुरुकुरीत चकली आवडते, काहींनी गोड लाडू तर काहींनी तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी आवडते. तुम्हालाही शंकरपाळी आवडत असेल तर बिस्किट सारखी चव असलेली ही शंकरपाळी एकदा खाऊन पाहा. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी बिस्किट शंकरपाळी कशी बनवायची रेसिपी जाणून घेऊ या….

बिस्किट शंकरपाळी रेसिपी

बिस्किट शंकरपाळीसाठी लागणारे साहित्य

पिठी साखर – एक वाटी
दूध- एक वाटी
तूप – एक वाटी तूप
मैदा – अर्धा किलो
मीठ -चवीनुसार
इसेन्स – एक चमचा

हेही वाचा –आंबट-गोड चटपटीत चाट खायला आवडतं? एकदा भाकरी चाट खाऊन तर पाहा

बिस्किट शंकरपाळे बनवण्याची कृती

प्रथम एका भांड्यात पिठी साखर, दूध आणि तूप घ्या. गरम झालेले तेल एका भांड्यात ओता त्यात मैदा चाळून घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि इसेन्स घाला. आता शंकरपाळ्याचे पीठ चांगले मळून घ्या. आता तयार पिठाचे पाता लाटा आणि एकदा घडी घाला आणि पुन्हा लाटा जेणेकरून त्याला जास्त पदर सुटतील. आता भाकरीसारखी जाडसर पाती लाटून घ्या आणि त्याचे शंकरपाळ्याचे आकारात कापून घ्या. गरम तेलामध्ये मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत शंकरपाळ्या चांगल्या तळून घ्या.

हेही वाचा- Chakli Recipe: दिवाळीत खमंग आणि कुरकुरीत चकलीसाठी भाजणीचे योग्य प्रमाण; वाचा परफेक्ट रेसिपी

हेही वाचा – सुरसुरी, चकरी अन् बॉम्ब! दिवाळीत बनवा माव्यापासून चवदार मिठाई, ट्रेंडिंग रेसिपी लगेच ट्राय करा

बिस्किटासारखी चव असलेली आणि पदर सुटलेली शंकरपाळी तयार आहे. तोंडात टाकल्यावर विरघळणारी ही शंकरपाळी घरातील सर्वांना नक्की आवडेल.