Diwali 2023 Recipes:   दिवाळीच्या फराळातील अनेकांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे करंजी. अतिशय पारंपरिक असलेला हा पदार्थ घरोघरी बनवला जातो. करंजीला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खूप महत्त्व असते. त्यामुळे अनेक जण फराळ बनवण्याची सुरुवातच करंजीपासून करतात. पण, चांगल्या खुसखुशीत, रुचकर व चविष्ट करंज्या बनवताना आपण दरवर्षी एकाच प्रकारचे सारण वापरतो. पण, आज आम्ही तुम्हाला सारणाचे चार वेगवेगळे प्रकार सांगणार आहोत. चारही प्रकारच्या सारणाचा वापर करून तुम्ही चविष्ट, खमंग अन् खुसखुशीत करंजी बनवू शकता. पण, या चार सारणांपैकी दोन सारणांच्या प्रकारात साखर; तर दोन प्रकारांत गुळाचा वापर करायचा आहे.

करंजीच्या सारणाचे चार वेगवेगळे प्रकार

१) सुके खोबरे आणि साखरेचे सारण :

सुके खोबरे- १ कप
पिठीसाखर – २.५ कप
खसखस- २ ते ३ टीस्पून
सुक्या मेव्याचे काप
साजूक तूप- २ टीस्पून
वेलची पावडर- १/४ टीस्पून

gobi keema recipe
Gobhi Keema Recipe: एका कोबीपासून बनवा ‘ही’ झणझणीत रेसिपी, लिहून घ्या साहित्य आणि कृती
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
tabebuia rosea flowers Mumbai
निसर्गलिपी : बहराचा उत्सव
Smriti Mandhana Century smashes fastest ODI hundred by an Indian woman in 70 balls against Ireland
Smriti Mandhana Century: स्मृती मानधनाचं वादळी शतक! वनडेमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय फलंदाज
Shani Pluto Ardhakedra Yog
२२ जानेवारीला शनि-यम निर्माण करणार शक्तीशाली योग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, अचानक होईल धनलाभ
soybean procurement deadline extension news in marathi
सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
makar sankranti 2025 til gul ladoo recipe in marathi easy til ladoo recipe for sankranti
तिळगुळ घ्या गोड गोड बोला! ‘या’ मकरसंक्रांतीला बनवा परफेक्ट तिळाचे लाडू, लिहून घ्या सीक्रेट रेसिपी

कृती

सुके खोबरे, खसखस फिकट सोनेरे रंग येईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर कढईत तूप टाकून, सुक्या मेव्याचे काप तळून घ्या. सुक्या मेव्याचे काप तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता खसखस मिक्सरमधून थोडे जाडसर वाटून घ्या. नंतर एका प्लेटमध्ये सुके खोबरे, खसखस पावडर, सुक्या मेव्याचे काप, वेलची पावडर एकत्र करा आणि त्यात पिठीसाखर टाकून मिश्रण (सर्व पदार्थ एकत्र करताना ते आधी थंड करून मगच टाका) एकजीव करा.

२) गुळाचे सारण

पांढरे तीळ- २०० ग्रॅम / १ कप
बारीक चिरलेला गूळ- २०० ग्रॅम / १ कप
सुके खोबरे- १०० ग्रॅम / १ कप
खसखस- २ ते ३ टीस्पून
वेलची पावडर- १/४ टीस्पून

कृती

सर्वप्रथम गरम कढईत तीळ खरपूस भाजून घ्या. त्याच प्रकारे खसखस व सुके खोबरेही भाजून घ्या. आता भाजून थंड केलेले तीळ, खसखस मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. आता त्यात बारीक चिरलेला गूळ, वेलची पावडर, भाजलेले खोबरे टाकून मिक्सरमध्ये पुन्हा वाटून घ्या.

३) गव्हाच्या पिठाचे आणि रव्याचे सारण

गव्हाचे पीठ- १/२ कप
बारीक रवा- १/२ कप
सुके खोबरे- १ कप
खसखस- २ ते ३ टीस्पून
पिठीसाखर- २.५ कप
सुक्या मेव्याचे काप
साजूक तूप- २ ते ३ टीस्पून
वेलची पावडर- १/४ टीस्पून

कृती

करंजीच्या प्रत्येक सारणात खसखस, खोबरे वापरले जाते. आता या प्रकारातही तुम्ही आधी खसखस, खोबरे वेगवेगळे भाजून घ्या. त्यानंतर त्याच कढईत साजूक तूप टाकून, रवा सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. आता पुन्हा कढईत तूप टाकून, गव्हाचे पीठ सोने रंग येईपर्यंत भाजून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात खसखस जाडसर बारीक करून घ्या. आता हाताने चुरलेले व भाजलेले सुके खोबरे, रवा, गव्हाचे पीठ, सुका मेवा, पिठीसाखर, वेलची पावडर टाका. आता या मिश्रणात तयार झालेल्या गुठळ्या नीट फोडा. अशा प्रकारे तुमचे सारण तयार झाले आहे.

४) चण्याच्या पिठाचे सारण

चणे हरभरे- १ किलो (७५० ग्रॅम डाळ मिळते.)
गूळ- ७५० ग्रॅम
सुके खोबरे- अर्धा किलो
काळे तीळ- पाव वाटी (पांढरे तीळही वापरू शकता)
वेलची पूड- ४ टीस्पून
जायफळ पूड – १ टीस्पून
मीठ- अर्धा टीस्पून
सुंठ पावडर- २ टेबलस्पून

कृती

चण्याचे पीठ चांगल्या प्रकारे भाजून, ते किसलेल्या गुळात चांगल्या प्रकारे मिसळा. त्यानंतर हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव होण्यासाठी मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात सुके खोबरे, काळे तीळ, जायफळ पूड, वेलची पूड, मीठ, सुंठ पावडर टाकून हे मिश्रण हवाबंद डब्यात ठेवू शकता. त्यात तूप गरम करून टाकल्यास, त्याचे तुम्ही लाडूही बनवू शकता.

(टीप : साहित्य वाटी / कपच्या मापाने घेतले आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल, तर त्याप्रमाणे साहित्य वाढवावे.)

(करंजीच्या सारणाचे हे प्रकार आपण Yogita’s Kitchen, Sarita’s Kitchen या दोन यूट्यूब चॅनलवरून जाणून घेतले आहेत.)

Story img Loader