How To Make Poha Chakli : दिवाळीला अवघे काही दिवस बाकी आहेत. तसेच यादरम्यान बाजारात खरेदी करण्यासाठी गर्दी दिसते आहे. विविध कंदील, पणत्या व रांगोळी यांनी मार्केट गजबजून गेलं आहे. कोणी नवीन कपडे घेण्यासाठी तर कोणी फराळ बनवण्यासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. दिवाळीत फराळासाठी भरपूर पदार्थ बनवले जातात. पण, त्यात चकली ही अनेकांची आवडती असते. पण, तुम्ही दरवर्षी एकाच पद्धतीची चकली खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी (Diwali Special Chakli Recipe) घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला पोह्यांची चकल्या कशी बनवायची हे सांगणार आहोत.

पोह्यांची चकली बनवण्यासाठी लागणारं साहित्य (How To Make Poha Chakli ):

१. एक वाटी तांदळाचे पीठ

sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Diwali faral recipe marathi Chakali bhajani recipe in marathi diwali faral in marathi
Chakli Recipe: दिवाळीत खमंग आणि कुरकुरीत चकलीसाठी भाजणीचे योग्य प्रमाण; वाचा परफेक्ट रेसिपी
5 different tyes Chakli Recipe in marathi
Diwali Faral Recipe : दिवाळीत नेहमीच्याच चकल्यांपेक्षा ट्राय करा ‘हे’ पाच वेगळे प्रकार; कुरकुरीत अन् चवीलाही भारी
Bhakri chaat recipe Video
आंबट-गोड चटपटीत चाट खायला आवडतं? एकदा भाकरी चाट खाऊन तर पाहा
karanji recipe in marathi homemade karanji karanji diwali faral recipe in marathi
एकदम पातळ आवरणाची आणि भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत करंजी; दिवाळीच्या फराळाला परेफेक्ट रेसिपी
Diwali Faral Recipe Shankarpale
Diwali Faral Recipe : तोंडात टाकताच विरघळेल अशी खुसखुशीत बिस्किट शंकरपाळी! जाणून घ्या सोपी रेसिपी
bhajaniche rolls
Diwali Faral Special : खुसखुशीत भाजणी रोल! या दिवाळीत बनवा बनवा हटके रेसिपी

२. एक वाटी पोहे

३. एक वाटी भाजलेली चण्याची डाळ

४. पांढरे‌ तिळ

५. मीठ

६. हळद

७. मसाला

८. ओवा

९. तेल

१०. पाणी

हेही वाचा…Diwali Special Laddoo : यंदा दिवाळीला फक्त २ पदार्थ वापरून करा असा लाडू ; गोड काय बनवायचं याचं टेन्शनचं होईल दूर

पोह्यांची चकली बनवण्याची कृती (Diwali Special Chakli Recipe) :

१. पोहे मिक्सरला बारीक करुन घ्या आणि मग चाळून घ्या.

२. नंतर अर्धी वाटी भाजलेली चण्याची डाळ मिक्सरला बारीक करुन चाळून घ्या.

३. त्यानंतर तांदळाचे पीठ चाळून घ्या.

४. हे सगळं मिक्स करुन घ्या.

५. दुसरीकडे एक वाटी पाणी उकळवून घ्या.

६. पाण्याला उकळी आली की, मीठ, हळद, मसाला, ओवा, पांढरे‌ ति, एक छोटा चमचा तेल त्यात घाला.

७. त्यानंतर उकळलेल्या पाण्यात मिक्स करुन घेतलेलं पिठ टाका.

८. थोडं हलवून घ्या आणि पाच मिनिटे तसचं ठेवून द्या.

९. नंतर पीठ मळून घ्या आणि चकल्या करायला घ्या.

१०. अशाप्रकारे तुमच्या पोह्यांची चकली (Diwali Special Chakli Recipe) तयार.

दिवाळीच्या आधी गृहिणी फराळ करण्यात मग्न होऊन जातात. अनेकदा काही जणींचा फराळ अत्यंत रुचकर होतो. मात्र, एखादा असा पदार्थ असतो जो मनासारखा होत नाही. त्यात चकली या पदार्थ भाजणी चुकल्यामुळे किंवा तेल व्यवस्थित न तापल्यामुळे चकल्या एकतर मऊ पडतात किंवा त्या कडक होतात. त्यामुळेच आज आपण काहीतरी नवीन पोह्यांची चकली बनवून पाहणार आहोत.

Story img Loader