दिवाळी सुरू झाली आहे आणि घरोघरी फराळाचा खमंग वास येत आहे. अनेकांना फराळावर ताव मारायला सुरुवात केली आहे. तुम्हालाही दिवाळीच्या फराळाचे पदार्थ आवडत असतील तर तुमच्यासाठी एक हटके रेसिपी येथे दिली आहे. करंजी, चकल्या, लाडू, चिवडा हे पदार्थ तर प्रत्येक घरामध्ये आवर्जून बनवते जातात पण या व्यक्तिरिक्त काही हटके पदार्थ आहेत जे दिवाळीनिमित्त बनवले जातात. अशाच एका फराळाचा पदार्थ म्हणजे तांदळाचे बोर. होय नाव जरी बोर असले तरी हे फळ नाही. ते फक्त बोराच्या आकाराचा फराळाचा पदार्थ आहे जो तांदळापासून बनवला जातो. विशेष म्हणजे हा पदार्थ तयार करण्यासाठी तांदूळ भाजणे मग त्याचे पीठ केले जाते. चला तर मग जाऊन घेऊ या तांदळाचे बोर कसे बनवायचे?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

  • तांदुळ
  • गरम पाणी
  • रवा
  • भाजलेले तीळ
  • वेलची पूड
  • भाजलेले खोबरे
  • गूळ
  • पिठी साखर

हेही वाचा – तिखट अन् कुरकरीत लसूण शेव खायला आवडते का? मग या दिवाळीत ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

कृती

  • प्रथम तवा गरम करून त्यावर तांदुळ चांगले लालसर होईपर्यंत भाजा आणि मग त्याचे पीठ तयार करा.
  • भाजलेल्या तांदळाच्या पीठामध्ये थोडे गरम पाणी करून ओलसर करून घ्या. त्यात रवा, भाजलेले तीळ, वेलच पूड, खोबरे टाका.
  • एका भांड्यात गरम पाणी करून त्यात पिठीसाखर आणि गूळ टाकून विरघळून घ्या. हे मिश्रण पिठात टाका आणि पीठ चांगले मळून घ्या.
  • आता तयार पिठाचे बोराच्या आकाराचे लहान गोळे करून गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

तांदळाचे बोर तयार आहे.

हेही वाचा –Diwali Faral Special : खुसखुशीत भाजणी रोल! या दिवाळीत बनवा बनवा हटके रेसिपी

हे रेसिपीrahul_salvi_photography नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यंदाच्या दिवाळीत हा हटके पदार्थ नक्की बनवून पाहा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali special faral make spicy dishes this diwali learn how to make rice bora snk