चकली, लाडू बनवणं बऱ्याचजणांना अवघड वाटतं म्हणून अनेकजण फराळाचे हे पदार्थ बाहेरून आणतात पण हलका, फुलका चिवडा करायला सोपा आणि कमीत कमी वेळेत तयार होणारा असल्यामुळे अनेकजण घरीच हा चिवडा बनवतात. पण तुम्ही कधी कारले कांदा कुरकुरे चिवडा खाल्लाय का? नाही ना, मग ही घ्या भन्नाट रेसिपी. या दिवाळीला हा वेगळा चिवडा नक्की करुन पाहा
कारले कांदा कुरकुरे चिवडा साहित्य
१/२ वाटी कारले चिप्स सुकवलेले)
१/४ वाटी कांदे चिप्स सूकवलेले
१/४ वाटी शेंगदाणे आणि काजू
१ टेबलस्पून हळद,लाल मिरची चाट मसाला,आमचूर पावडर,धणे जीरे
१/४ टेबलस्पून चिवडा मसाला (ऑप्शनल)
मनुके (ऑप्शनल)
कडीपत्ता
काळ मीठ चवीनुसार,पिंक सॉल्ट
१/४ वाटी तेल
१मटीस्पून लसूण पावडर
१ टेबलस्पून राई
२ सुक्या लाल मिरच्या
कारले कांदा कुरकुरे चिवडा कृती
१. प्रथम तेल गरम करावे आणि नंतर मंद आचेवर कारले कांदा चीप्स तळून घ्यावेत, आणि नंतर काजू, शेंगदाणे तळून घ्यावेत.
२. आता फोडणीसाठी पसरट टोपात गरम तेल दोन चमचे घेऊन तेल गरम करावे. नंतर प्रथम राई फोडणीला घालून तडतडली की त्यात कडीपत्ता लाल मिरच्या घालून छान परतून घ्यावे.
३. नंतर त्यात तळून ठेवलेले कारले, काजू, शेंगदाणे घालावे आणि नंतर त्यात सगळे मसाले घालून हलवून घ्यावे.
हेही वाचा >> एकदम पातळ आवरणाची आणि भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत करंजी; दिवाळीच्या फराळाला परेफेक्ट रेसिपी
४. अगदी शेवटी मीठ, लसूण पावडर, कांदे घालून हलवून घ्यावे (कांदे चिप्स जास्त हलवू नका कारण ते फार हलके असतात) अशाप्रकारे आपला टेस्टी चिवडा तयार आहे. एअर टाईट किंवा काचेच्या बरणीत हा चिवडा भरून ठेवावे.