How To Make Diwali Special Laddoo : दिवाळीला सगळ्यांच्या घरी फराळ बनवला जातो. या फराळात चकलीपासून ते लाडूपर्यंत अनेक पदार्थ असतात. कारण – दिवाळीत घरी तयार करण्यात येणाऱ्या फराळाची चव विकतच्या पदार्थांना नसते. पण, अनेकदा नोकरदार महिलांना वेळेअभावी हे पदार्थ घरी तयार करणे शक्य होत नाही. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला झटपट होणारा एखादा गोड पदार्थ (Diwali Special Laddoo) करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. या गोड पदार्थाचे नाव आहे ओरिओ फज लाडू (बॉल्स). चला तर पाहुयात हा पदार्थ कसा बनवायचा ते…
साहित्य :
१. खजूर
२. ओरिओ बिस्किटे
३. कोको पावडर
४. पाणी
व्हिडीओ नक्की बघा…
कृती (How To Make Diwali Special Laddoo) :
१. दहा खजूर घ्या. पहिलं खजूरांना चांगलं धुऊन घ्या आणि त्यातील बिया काढा.
२. त्यानंतर एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा.पाणी उकळल्यावर खजूर त्यात टाका.
३. दोन मिनिटं पाण्यात उकळवा. नंतर खजूर बाहेर काढा आणि थंड होऊ द्या.
४. मिक्सरमध्ये ३० बारीक चिरलेली ओरिओ बिस्किटे घ्या त्यात एक चमचा कोको पावडर घालून फज (Fudge) बनवा.
५. ओरिओ फज बॉल्स बनवण्यासाठी सगळ्यात पहिला हाताला तेल लावा आणि मिश्रणाचे वर्तुळाकार बॉल्स बनवून घ्या.
६. तयार बॉल्सना कुस्करलेल्या ओरिओने सजावट करा आणि खायला घेण्यापूर्वी किमान २ तास रेफ्रिजरेट करा.
७. अशाप्रकारे तुमचे ओरिओ फज बॉल्स (Diwali Special Laddoo) तयार.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ आणि ही रेसिपी @ohyumness या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल की, हे स्वादिष्ट ओरिओ फज बॉल्स बनवण्यासाठी फक्त 3 साहित्य लागतील. तसेच अगदी कमी वेळात हे लाडू किंवा बॉल्स तयार होतील. अशाप्रकारे तुमचा फराळातील एक पदार्थ तयार. अशाप्रकारे तुमचा फराळही तयार होईल आणि तुमचा वेळही वाचेल.