चकली, लाडू बनवणं बऱ्याचजणांना अवघड वाटतं म्हणून अनेकजण फराळाचे हे पदार्थ बाहेरून आणतात पण हलका, फुलका चिवडा करायला सोपा आणि कमीत कमी वेळेत तयार होणारा असल्यामुळे अनेकजण घरीच हा चिवडा बनवतात. पातळ पोहे म्हटलं की चिवडा आकसतो तरी कधी चिवडा जास्त वातड होतो. डब्यात भरून ठेवलेला चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत राहावा यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवाव्या लागतील.

पोह्यांचा चिवडा साहित्य

अर्धा किलो पातळ पोहे
अर्धी वाटी डाळव किंवा फुटाण्याची डाळ
एक वाटी खोबऱ्याचे काप
अर्धी वाटी काजू
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
तेल, बारीक कापलेले लसून
पिठीसाखर, मोहरी
हळद, चवीनुसार मीठ

पोह्यांचा चिवडा करण्याची कृती

सगळ्यात आधी कढई गॅसवर तापत ठेवा. कढई थोडी तापली, की त्यामध्ये पोहे टाका आणि अगदी मंच आचेवर ५ ते ७ मिनिटे भाजून घ्या.

पोहे जास्त असतील, तर थोडे थोडे करून भाजून घ्या.यानंतर पोहे एका मोठ्या परातीत किंवा पातेल्यात काढून घ्या.

आता कढईत तेल टाका. तेल गरम झाल्यावर सगळ्यात आधी काजू टाका आणि गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत चांगले परतून घ्या.

यानंतर काजू काढून घ्या आणि खोबऱ्याचे काप टाकून तेलात तळून घ्या. गॅस मंदच ठेवावा अन्यथा खोबरे किंवा काजू जळण्याची शक्यता असते.

खोबरे परतल्यावर कढईतून काढून घ्या आणि शेंगदाणे परतून कढईतून बाजूला काढून ठेवा. आता या तेलातच मोहरी टाकून फोडणी होऊ द्यावी.

फोडणी झाल्यावर कढीपत्त्याची पाने टाकावी. कढीपत्त्याची पाने चांगली तडतडली की, त्यानंतरच त्यात हळद, लसूण, हिरव्या मिरच्या टाका.

लसूणाचा रंग बदलेपर्यंत खरपूस भाजून घ्यावा.यानंतर ही फोडणी आता पोह्यांवर घाला. त्यासोबतच आधी तळून घेतलेले खोबऱ्याचे काप, शेंगदाणे, काजू हे सगळेही पोह्यांमध्ये टाकावेत.

तसेच पिठीसाखर आणि चवीनुसार मीठ टाकावे आणि अगदी हलक्या हाताने हे सगळे मिश्रण हलवावे.
पोह्यांचा मस्त, खुसखुशीत, खमंग चिवडा झाला तय्यार.

हेही वाचा >> दिवाळीसाठी १/२ किलो तांदुळापासून बनवा जाळीदार अनारसे; तांदूळ भिजवण्यापासून तळण्यापर्यंतची सोपी रेसिपी

तुमचाही चिवडा नरम होतो का? मग खाली दिलेल्या सूचना नीट वाचा

चिवड्यासाठी आपण जे पोहे वापरतो ते पोहे मऊ पडू नयेत असे वाटत असेल तर त्याला जेव्हा ऊन पडते तेव्हा. चांगल्या कडक उन्हात ठेवावे.

घरात जर ऊन येत नसेल तर मायक्रोव्हेवमध्ये किंवा कढईमध्ये हे पोहे चांगले परतून गरम करुन घ्या. त्यामुळे तुमचा चिवडा शेवटपर्यंत कुरकुरीत राहील.

तसेच चिवड्यात घालायची कोथिंबीर, मिरच्या, कढीपत्ता हे सगळं पुसून कोरडे करुन घ्या.

चिवडा झाल्यावर पूर्ण गार झाल्याशिवाय गरम गरम डब्यात भरून ठेऊ नका.

हळदही फोडणी उतरवून शेवटी घालावी म्हणजे रंग काढपट होणार नाही.

चला तर मग आता पाहुयात दिवाळीच्या चिवड्याची सोपी रेसिपी