Diwali Special Protein Laddoos Recipe In Marathi : प्रत्येक सणानिमित सर्वत्र गजबज पाहायला मिळते. पण, दिवाळी हा असा एक सण आहे, ज्यात आकाशकंदील, पणत्या, दारात रांगोळी, तोरण, विद्युत रोषणाई सजावट केली जाते. फक्त सजावट नाही तर घरोघरी फराळ सुद्धा बनवला जातो. या फराळात चकली, करंजी, शंकरपाळी, चिवडा आणि लाडू देखील बनवले जातात. आपल्यातील अनेकांचा लाडू हा पदार्थ खूप आवडीचा आहे. तर तुम्हाला दिवाळीत लाडू खाण्याचाही आनंद घ्यायचा आहे आणि तुमचं वजन सुद्धा नियंत्रणात ठेवायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्याचे नाव आहे सुपर हेल्दी, हाय-प्रोटीन लाडू (Diwali Special Protein Laddoos) . चला तर हे लाडू कसे बनवायचे हे आपण पाहुयात…

साहित्य (Diwali Special Protein Laddoos ingredients ):

१. दोन चमचे अंबाडीच्या बिया

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Korean Maggie Recipe
एक मॅगीचं पॅकेट आणा आणि झटपट बनवा कोरिअन स्टाईल मॅगी, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती

२. दोन चमचे चिया सीड्स

३. दोन चमचे तीळ

४. दोन चमचे भोपळ्याच्या बिया

५. दोन चमचे सूर्यफूलाच्या बिया

६. १/२ कप सातू पावडर

७. १/२ कप खजूर (खोडलेले)

८. चार चमचे पीनट बटर

९. एक चमचे तूप

१०. एक चमचा वेलची पावडर

हेही वाचा…Roti Besan Pakode : संध्याकाळी चहाबरोबर काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय? मग पोळ्यांचे करा असे भन्नाट ‘पकोडे’

व्हिडीओ नक्की बघा…

कृती (How To Make Diwali Special Protein Laddoos) :

१. एका कढईत अंबाडीच्या बिया, चिया सीड्स, तीळ, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफूल बिया मध्यम आचेवर सुगंधी होईपर्यंत (साधारण ४-५ मिनिटे) भाजून घ्या. त्यानंतर कढई गॅसवरून काढा आणि थोडा थंड होऊ द्या.

२. थंड झाल्यावर, मिक्सर वापरून भाजलेल्या बियांची पावडर करून घ्या.

३. त्याच पॅनमध्ये, सातू पावडर मध्यम आचेवर सुमारे तीन ते चार मिनिटे भाजून घ्या आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

४. मिक्सरमध्ये, खजूर आणि पीनट बटर गुळगुळीत पेस्ट होईल असा बारीक करून घ्या.

५. एका प्लेटमध्ये बियांची पवार, भाजलेली सातूची पावडर आणि खजूर-पीनट बटरचे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.

६. त्यानंतर त्यात इलायची पावडर घाला. जर मिश्रण खूप कोरडे वाटत असेल तर लाडू बांधण्यापूर्वी एक चमचा तूप घाला.

७. थोडं-थोडं मिश्रण हातात घेऊन लाडू वळण्यास सुरुवात करा.

८. तुमचे सुपर हेल्दी, हाय-प्रोटीन लाडू दिवाळीसाठी तयार.

सोशल मीडियावर ही रेसिपी आणि हा व्हिडीओ @kirtibhoutika या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Story img Loader