दिवाळी म्हटलं काहीतरी गोड मिठाई ही असतेचं. तुम्हाला जर दिवाळीमध्ये झटपट काहीतरी मिठाई तयार करायची असेल तुमच्यासाठी सोपी रेसिपी सांगणार आहोत. दिवाळीच्या गडबडीत तुम्ही झटपट तयार होईल असे ब्रेडचे गुलाबजाम बनवू शकता. बनवयाला अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम अशी ही रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून पाहा. चला मग जाणून घेऊ या रेसिपी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

पाक बनवण्यासाठी
२ वाट्या साखर
२ मोठे ग्लास पाणी
१ टी स्पून वेलची पावडर

हेही वाचा – Diwali Faral : कुरकुरीत शेव खायला आवडते? मग आता घरीच बनवा, जाणून घ्या बेसन शेव रेसिपी


गुलाबजाम बनवण्यासाठी

२ पॅकेट ब्रेड स्लाइस
१ कप दूध
८-१० काजू तुकडे
केशर
तूप किंवा तेल
बदाम व पिस्ता सजावटीसाठी

हेही वाचा – करंजी, चकली, शंकरपाळ्या तळताना तेलातील गाळ कसा साफ करावा? जाणून घ्या सोपी ट्रिक

कृती

पाक बनवण्यासाठी एका जाड बुडाच्या भांड्यात साखर व पाणी एकत्र करून मध्यम आचेवर पाक ठेवा. ५ ते ७ मिनिटांमध्ये पाक तयार होईल. पार फार पातळ किंवा फार घट्ट बनवायाचा नाही. अगदी थोडासा चिकट झाला पाहिजे. त्यात केसर, वेलची पावडर टाकून एकत्र करा आणि गॅस बंद करून भाडे झाकून ठेवा. गुलाबजाम बनवण्यासाठी प्रथम ब्रेडच्या चारी बाजूच्या कडा कापून बाजूला ठेवा. ब्रेडच्या कडा कटलेटसाठी वापरता येऊ शकतात. ब्रेडच्या कडा कापल्यावर एका बाऊलमध्ये ब्रेडचे पकोडे करून घेऊन त्याचा चूरा करून घ्या. मग त्यामध्ये थोडे थोडे दूध घालून आपण जसे पीठ मळतो तसे मळावे. पीठ फार घट्ट किंवा सैल मळू नका. ५ मिनिटे बाजूला ठेवा. मळलेल्या पिठाचे छोटे -छोटे एक सारखे गोळे बनवा. एक गोळा बनवला की त्यात काडून खोचून नीट बंद करा. गोळ वळताना हाताला तेल लावून मळले तरी चालेल. कढईमध्ये तूप अथवा तेल गरम करून घ्या. गोळे नीट तळून घ्या. साखरेचा पाक बनवलेल्या भांड्यात तळलेले गुलाबजाम घालून झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटे गरम करा. थंड झाल्यावर बाऊलमध्ये काढून घेऊन त्यावर बदाम व पिस्ते चिरून घालावा मग सर्व्ह करा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali special recipe how to make bread gulab jam note down recipe snk