Diwali Sweets Recipe: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हटलं की दिवे, रांगोळी, फराळ या गोष्टी डोळ्यांसमोर आपसूकच येतात. यात खव्वयेप्रेमींना प्रतिक्षा असते ती वेगवेगळे फराळ आणि मिठाईची. चकली, लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, अनारसे, शेव असे विविध फराळ अनेकांच्या घरी बनवले जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळीत जशी फराळ खायला मजा येते तशीच मिठाई खाण्याची इच्छाही अनेकांना असते. पण नेहमी तशीच मिठाई खाऊन पण कंटाळा येतो. म्हणूनच आज आपण चक्क फटाक्यांच्या आकारांची मिठाई कशी बनवायची ते जाणून घेणार आहोत. घरी बनवलेला इंस्टंट मावा वापरून सुरसुरी, चकरी आणि बॉम्ब कसा बनवायचा हे लगेच वाचा.

हेही वाचा… ‘ब्रेड पिझ्झा पॉकेट्स’ ही ट्रेंडिंग रेसिपी कधी ट्राय केलीय का? नाही ना! मग एकदा साहित्य आणि कृती वाचाच

साहित्य

  • ५०० मि.ली. दूध
  • १ कप दूध पावडर
  • १/२ कप साखर
  • ३ टेबलस्पून तूप
  • २ टेबलस्पून केशर भिजवलेले दूध
  • ३ टेबलस्पून बीटाचा रस
  • २ टेबलस्पून खोबरे
  • ४-५ थेंब रोज इसेन्स

हेही वाचा… बटाट्यापासून झटक्यात बनवा ‘क्रंची पोटॅटो फिंगर्स’, वाचा साहित्य आणि कृती

कृती

१. एका कढईत दूध, दूध पावडर, तूप, साखर घ्या. त्यांचे व्यवस्थित मिश्रण करा आणि नंतर गॅस चालू करा. मिश्रण सतत हलवत राहा जेणेकरून ते सुटसुटीत राहावे.

२. मिश्रण हळू आचेवर शिजवा. शिजवल्यावरमिश्रण घट्ट होत जाईल आणि हळूहळू पीठात रूपांतरित होईल. जास्त काळ शिजवू नका. गॅस बंद करा. आता रोज इसेन्स घाला, चांगले मिसळा आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवा. मावा तयार आहे.

३. एकदा मावा थंड झाल्यावर, त्याला तीन भागात विभाजित करा. गुलाबी रंगासाठी एका भागात बीटचा रस घाला आणि पिवळ्या रंगासाठी दुसऱ्या भागात केशराचे दूध घाला. तिसरा भाग सफेद ठेवा.

४. आता पीठाचा छोटा भाग घेऊन त्याला सुरसुरी, चकरी आणि बॉम्बचा आकार द्या.

५. आकार दिल्यानंतर हे दिवाळीचे गोड पदार्थ प्लेटमध्ये सर्व्ह करा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali sweets recipe mithai with instant mawa fire crackers phuljhadi chakri bomb dvr