Paratha Recipe For Breakfast : तुमच्यापैकी अनेक जण आलू पराठा किंवा मेथी पराठा आवडीने खात असतील. यात सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी चवदार हेल्दी खायचे असते, तेव्हा आलू किंवा मेथी पराठ्याचा बेत आखला जातो. हे पराठे तुमच्या आरोग्यासाठीदेखील पौष्टिक असतात. पण, आजवर तुम्ही पराठ्याचे विविध प्रकार ऐकले असतील किंवा टेस्ट केले असतील, पण तुम्ही ओल्या नारळाचा पराठा खाल्ला आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला खास रविवारच्या नाश्त्यासाठी ओल्या नारळाचा पराठा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

ही रेसिपी चविष्ट असण्याबरोबरच पौष्टिकही आहे, त्यामुळे तुम्ही हा पराठा मुलांना डब्यातही देऊ शकता. अगदी कमी साहित्य वापरून खमंग ओल्या नारळाचा पराठा कसा करायचा ते आता पाहूया…

chinchechi kadhi recipe in marathi
चटकदार चिंचेची कढी; कमी साहित्यात बनेल अशी परफेक्ट कढी
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Sandwich sandwich recipe curd sandwich recipe in marathi
Sandwich Recipe: ब्रेकफास्टमध्ये झटपट बनवा दही सँडविच; एकदम सोपी आहे रेसिपी
Rishi panchami rushichi bhaaji ganeshotsav 2024 ganpati special recipes in marathi
Rishi Panchami: ‘ऋषीची भाजी’ कशी बनवायची? जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत
Maharashtrian Khichdi Recipe In Marathi Tur dal ani Val Khichdi Recipe In Marathi
तूर आणि वालाची मसाला खिचडी; रात्रीच्या जेवणाला १० मिनिटांत बनवा अस्सल महाराष्ट्रीयन बेत
Breakfast Recipes make this healthy aata chila recipe for sunday breakfast
Quick Breakfast Recipes : नाश्त्याला बनवा हेल्दी आटा चिला; झटपट अन् सोपी मराठी रेसिपी
Lunch Recipe in marathi Veg Recipe gavran dudhichi bhaji recipe in marathi
भोपळ्याची आंबट-गोड भाजी; एकदा खाल तर खातच रहाल अशी सोपी रेसिपी
latiwadi
सांगली साताऱ्याची प्रसिद्ध लाटीवडी! मैदा न टाकता झटपट बनवा पारंपारिक पदार्थ, ‘ही’ घ्या रेसिपी

ओल्या नारळाचा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Olya Narlacha Paratha Recipe)

अर्धा वाटी किसलेलं ओलं खोबरं
एक वाटी गव्हाचे पीठ
हिरव्या मिरच्या
आलं – लसूण पेस्ट
जिरे
कोथिंबीर
साखर
सुकं खोबरं
१ लाल मिरची
चवीपुरते मीठ
तेल आणि तूप
लिंबू

ओल्या नारळाचा पराठा बनवण्याची कृती

ओल्या नारळाचा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम अर्धा वाटी किसलेलं ओल खोबरं, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, जिरे, कोथिंबीर, सुकं खोबरं, १ लाल मिरची हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्या. यानंतर त्यात चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबू पिळून सारण तयार करा आणि बाजूला ठेवा. तुम्ही सारणात तुमच्या आवडीनुसार धणे-जिरे पावडर किंवा विविध प्रकारचे मसालेही टाकू शकता.

आता एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि पाणी घालून चांगले मळून घ्या. अशाप्रकारे मळलेली कणीक ५ मिनिटे झाकून ठेवा. यानंतर आपण पुरणपोळीत जसे पुरण भरतो, अगदी त्याचप्रकारे तयार सारण पिठाच्या गोळ्यात भरा आणि हलक्या हाताने पराठा नीट लाटून घ्या. आता तव्यावर थोडे तूप किंवा तेल सोडून पराठा दोन्ही बाजूने भाजा. तुम्ही आवडीनुसार बटरही लावू शकता.

अशाप्रकारे ओल्या नारळाचा पराठा खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही हे दही, ओल्या नारळाची चटणी, कोशिंबीर किंवा तिखट सॉसबरोबरदेखील खाऊ शकता.