Shev Bhaji Video : शेवभाजी हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. शेवभाजी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे पण तुम्ही कधी चुलीवरची शेवभाजी खाल्ली आहे का? होय, चुलीवरची शेवभाजी. ही शेवभाजी चवीला अत्यंत स्वादिष्ट वाटते. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की चुलीवरची शेवभाजी कशी बनवायची? सध्या एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चुलीवर शेवभाजी कशी बनवायची, हे सांगितले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

  • सुरुवातीला एक मातीचे भांडे घ्यावे आणि पेटत्या चुलीवर ठेवावे. त्यात तेल गरम करावे.
  • गरम तेलात जिरे, मोहरी आणि तमालपत्र टाकावे.
  • दोन ती हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा टाकावा आणि चांगले परतून घ्यावे
  • आलं लणसाची पेस्ट आणि हिंग टाकावे.
  • मिक्सरमध्ये बारीक केलेले टोमॅटोची प्यूरी टाकावी.
  • लाल तिखट टाकावे. त्यानंतर कांदा लसूण मसाला चटणी टाकावी.
  • चवीनुसार मीठ टाकावे.
  • शेवटी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
  • त्यात थोडे गरम पाणी टाकावे आणि मातीचे भांड्यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्यावे.
  • त्यानंतर पुन्हा थोडे पाणी घालावे आणि शेवटी कोथिंबीर घालावी.
  • आणि सर्वात शेवटी शेव घालावे.
  • तुमची शेवभाजी तयार होईल.

हेही वाचा : Kadhi Gole : असे बनवा तुरीच्या दाण्यांपासून पौष्टिक कढी गोळे, ही रेसिपी लगेच नोट करा

tasty_chav या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चुलीवरची झणझणीत शेवभाजी आवडली काय ..
साहित्य खालीलप्रमाणे –

  • तिखट शेव
  • तेल – २ चमचे
  • तमालपत्र – २
  • हिंग – अर्धा चमचा
  • मोहरी – १ चमचा
  • जिरे – १ चमचा
  • हिरवी मिरची – १
  • कढीपत्ता – ४ ते ५ पाने
  • कांदा – २ बारीक चिरुन
  • आल लसूण पेस्ट – १ चमचा
  • टोमॅटो – २
  • गरम मसाला – १ चमचा
  • धनापावडर – १ चमचा
  • हळद – १ चमचा
  • लाल मिरची पावडर – १ चमचा
  • कांदा लसूण मसाला चटणी – १ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर”

tasty_chav या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन अनेक रेसिपीचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या अकाउंटवरुन मराठी पदार्थ कसे बनवले जातात, हे सांगितले जाते.

या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “शेवभाजी हा प्रकार कधीच नसतो. कुणी शोधून काढलाय हा प्रकार काय माहिती..” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान दिसत आहे शेवभाजी” तर एका युजरने लिहिलेय, “एकदम स्वादिष्ट आणि झणझणीत”

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you ever eat shev bhaji made on chulha note down shev bhaji recipe watch viral video of marathi food ndj