दिवाळीच्या फराळ म्हटल की, लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळ्या, करंजी असे विविध पदार्थ बनवले जातात. प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ वेगळा असतो. कोणाला लाडू आवडतो तर कोणाला चकली आवडले, कोणाला शंकरपाळ्या आवडतात तर कोणाला करंजी आवडते. दिवाळीच्या पदार्थांपैकी एक पदार्थ सर्वांना आवडतो तो म्हणजे तिखट आणि कुरकुरीत लसूण शेव. तुम्हाला जर कुरकरीत तिखट लसूण शेव खायला आवडत असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. अनेकांनी शेव नुसती खायला आवडते अनेकना शेव चिवड्यामध्ये टाकून खायला आवडते. शेव तयार करणे तसे सोपे काम आहे पण तिला कुरकुरीतपणा आला तर खरी मजा येते. चला तर मग आज लसूण शेव तयार करण्याची रेसिपी जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लसूण शेव रेसिपी

साहित्य

१/४ कप पाणी
१/४ कप तेल
चवीपुरते मिठ
१/२ ते ३/४ कप बेसन (मावेल इतपत घालावे)
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून ओव्याची पुड
तेल तळण्यासाठी
पाव वाटी – लसूण
एक चमचा – जिरे
दोन चमचा – तिखट
मीठ – चवीनुसार

हेही वाचा –

हेही वाचा –Diwali Faral Special : खुसखुशीत भाजणी रोल! या दिवाळीत बनवा बनवा हटके रेसिपी

लसूण शेव कशी बनवावी

  • प्रथम मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी लसूण, मीठ जिरे तिखट आणि थोडे पाणी टाकून वाटून घ्या
  • आता एका गाळणीमध्ये तयारमिश्रण टाकून त्यातील पाणी ओतून चोथा वेगळा करा. तिखट पाणी बाजूला ठेवा
  • तेल, ओवापुड आणि पाणी एकत्र करून फेटून घ्यावे. नीट एकजीव होवू द्या. मिश्रण चांगले पांढरे झाले पाहिजे. या मिश्रणात चवीपुरते मीठ आणि हळद आणि तयार तिखटाचे पाणी घालून एकत्र करा. यामध्ये गरजेनुसार चमचा-चमचा बेसन घालून चांगले घोटावे. बऱ्यापैकी घट्टसर मिश्रण करावे. पातळ अजिबात नको, पण एकदम पिठाचा गोळाही मळू नये.
  • सोऱ्यामध्ये बारीक शेवेची ताटली बसवावी व आतल्या बाजूने तेलाचा हात लावावा.
  • कढईत तेल गरम करायला ठेवावे. मिश्रण सोऱ्यामध्ये गरम तेलात आतून बाहेर असे २-३ वेळा गोलाकारात शेव पाडावी. शेव व्यवस्थित तळून घ्यावी. जास्तवेळ तळू नये, यामुळे शेवेचा रंग बदलतो.
  • तळलेली शेव टिश्यू पेपरवर काढावी. त्यावर तळलेले शेंगदाणे आणि कडीपत्ता आणि थोडा लसूण टाकावा.
  • लसूण शेव तयार आहे. हलक्या हाताने चुरडून घ्यावी.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you like to eat spicy and crunchy garlic sev then try this recipe once this diwali snk