Bhendi Fries Recipe : काही लोकांना काही भाज्या आवडत नाही. त्यामुळे ते त्या भाज्या खाणे टाळतात. तुम्हाला जर भेंडी खायला आवडत नसेल तर आम्ही तुम्हाला भेंडीपासून बनवता येणारा एक हटके पदार्थ सांगणार आहोत. तुम्ही कधी भेंडी फ्राय नावाचा पदार्थ खाल्ला आहे का? फ्रेंच फ्राइजसारखा दिसणारा हा पदार्थ अत्यंत चविष्ठ आणि तितकाच बनवायला सोपी आहे. लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सर्वांना हा हटके पदार्थ आवडू शकतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल, की हा पदार्थ कसा बनवायचा? अगदी सोपी आहे. तुम्ही दहा मिनिटांमध्ये हे कुरकुरीत असे भेंडी फ्राइज बनवू शकता. आज आपण ही रेसिपी जाणून घेणार आहोत. (do you not like bhendi or ladies finger bhaji then do bhendi fries note down recipe)
सोशल मीडियावर नवनवीन रेसिपी सांगणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. अशातच एका व्हिडीओमध्ये हा पदार्थ कसा बनवायचा, याविषयी सांगितले आहे.

व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

साहित्य –

  • भेंडी
  • आमचुर पावडर/लिंबाचा रस
  • लाल मिरची पावडर
  • जिरे पावडर
  • बेसन पीठ
  • मीठ
  • तेल

हेही वाचा : Sabudana Khichdi : साबुदाणा खिचडी चिकट होतेय? या टिप्स वापरून बनवा मऊ , मोकळी अन् लुसलुशीत साबुदाणा खिचडी

कृती –

  • सुरुवातीला भेंडी घ्या आणि ती स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर पुसून घ्या.
  • भेंडी उभी चिरून घ्या आणि त्यातील सर्व बिया काढून घ्या
  • त्यानंतर त्यात आमचुर पावडर टाका. जर तुमच्याकडे आमचुर पावडर नसेल तर लिंबाचा रस टाका.
  • त्यानंतर त्यात लाल मिरची पावडर आणि जिरे पावडर टाका. सर्व मिश्रण एकत्र करा.
  • त्यानंतर त्यात तीन चमचे बेसन पीठ घाला. बेसन पीठ सुद्धा नीट मिक्स करून घ्या जेणेकरून भेंडी बेसनाने झाकली जाईल.
  • त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला.
  • गॅसवर कढई ठेवा आणि तेल गरम करा.
  • गरम तेलातून ही उभी चिरलेली भेंडी तळून घ्या.
  • कुरकुरीत होईपर्यंत भेंडी चांगल्याने तळून घ्या.
  • हा स्वादिष्ट पदार्थ तुम्ही टोमॅटो सॉस किंवा इतर कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : संत्र्यापेक्षा सहा पट जास्त व्हिटॅमिन ‘सी’ असलेले काजु बोंडाचे सरबत; ‘ही’ घ्या सोपी मराठी रेसिपी

nagarithaska या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अशी बनवा कुरकुरीत भेंडी” या अकाउंटवरून अनेक हटके अशा अस्सल मराठमोळ्या पद्धतीच्या सर्व रेसिपी सांगितल्या आहेत.