How to make Idli Chaat: सकाळचा नाश्ता पौष्टिक असावा, ज्यामुळे आरोग्यही चांगले राहते आणि संपूर्ण दिवस उत्साही असल्यासारखे वाटते. पण, अनेकदा हा पौष्टिक नाश्ता फारसा चविष्ट नसल्यामुळे अनेक जण तो टाळतात. अशा परिस्थितीत तुम्ही पौष्टिक, पण चवीला चटपटीत असलेला टेस्टी नाश्ता काही क्षणात बनवू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी दक्षिण भारतीय पदार्थ असलेल्या इडली चाटची चविष्ट आणि आरोग्यदायी रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही ते सहज आणि खूप लवकर तयार करू शकता. खरं तर, दक्षिण भारतीय पदार्थ इडली हा आता संपूर्ण भारतात खूप लोकप्रिय आहे.
इडली चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- ७-८ इडल्या
- १/२ वाटी दही
- १ वाटी कांदा
- १ वाटी टोमॅटो
- ३-४ हिरव्या मिरच्या
- १/२ वाटी शेव
- १/२ चमचा लाल तिखट
- १/२ चमचा चाट मसाला
- मीठ चवीनुसार
- कोथिंबीर
- तेल आवश्यकतेनुसार
इडली चाट बनवण्याची कृती:
- इडली चाट बनवण्यासाठी आधी इडलीचे छोटे तुकडे करा आणि एका पॅनमध्ये थोडे तेल घाला आणि ते सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा.
- आता ते एका प्लेटमध्ये काढा. आता त्यात फेटलेले दही, चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची, शेव, कोथिंबीर घाला. त्यावर तुम्ही चाट मसाला, तिखटदेखील घालू शकता.
- यानंतर तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि प्लेटमध्ये सर्व्ह करा.