काजू,बदाम,पिस्ता खायला सर्वांनाच आवडत असेल, पण खजुराची गोष्टच वेगळी आहे. वजन कमी करण्यासाठी सकस आहाराची गरज असते. पण याच आहारात खजूर नसेल, तर तुमच्या आहरात महत्वाचं घटक मिस झाल्यासारखंच होईल. कारण खजुराचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. फक्त खजुराचं सेवन कोणत्या वेळी करायचं आणि ते किती प्रमाणात खायचं, याबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक असतं. खजुरात फायबर, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम आणि इतर आवश्यक जीवनसत्वे असतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे खजुराचे पदार्थही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. मग खजुराच्या रोलवर ताव मारण्याची संधी सोडू नका. कारण आम्ही तु्म्हाला खजुराचे रोल बनवण्याची साधी आणि सोपी रेसिपी सांगणार आहोत.
नक्की वाचा – तांदळाच्या नाही, आता नाचणीच्या इडलीवर ताव मारा, चरबी वाढणार नाही अन् हाडेही होतील मजबूत
साहित्य – खजूर अर्धा किलो, काजू १०-१२, बदाम १०-१२, तूप दोन चमचे, खसखस एक चमचा
कृती – पहिल्यांदा खजुरातल्या बिया काढून घ्या. खजुराचा लगदा करुन मळून घ्या. पसरट ताटाला तूप लावून घ्या. या ताटावर खजूर पसरवा. काजू आणि बदाम यांचे बारीक तुकडे करुन घ्या व ते खजूराच्या मिश्रणावर पसरवा. आता संपूर्ण पसरवलेल्या खजुराची गुंळाळून सुरळी करा. ही सुरळी खसखशीवर रोल करा म्हणजे त्याला बाहेरुन खसखस लागेल. या सुरळीचे बारीक काप करत वड्या पाडा.
उपयोग – खजूर हा शरीराचं बळ वाढवण्यासाठी मदत करतो. शरीरातलं पित्त कमी करायला मदत करतो. या पद्धतीने रोल बनवल्यानं लहान मुलांना व सर्वांनाच खाण्यासाठी सोयीचं जातं.