आज आपण ड्रॅगन चिकनची भन्नाट रेसिपी पाहणार आहोत. घाबरू नका, यात ड्रगनचा काहीही समावेश नाही तर हा चिकनपासून तयार केला जाणारा एक स्पायसी पदार्थ आहे. कुरकुरीत चिकन आणि त्यावर स्पायसी ग्रेव्ही यांचा संगम म्हणजे ड्रॅगन चिकन. हा पदार्थ चवीला अप्रतिम लागतो. हा पदार्थ अनेक हॉटेल्समध्ये सर्व्ह केला जातो मात्र आज आम्ही तुम्हाला हा पदार्थ घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ड्रॅगन चिकन साहित्य

३५० ग्राम चिकन ब्रेस्ट स्ट्रिप्स
१ टीस्पून सोया सॉस
१/४ टीस्पून काळी मिरी पावडर
१/२ टीस्पून लाल तिखट पावडर
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून मैदा
१ टीस्पून लसूण बारीक चिरलेला
१ टीस्पून रेड सॉस
१ मध्यम उभा चिरलेला कांदा
१ टीस्पून टोमॅटो केचप
चवीनुसार मीठ
१ टीस्पून कॉर्नफ्लोअर
१/४ ग्लास पाणी
बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची
कांद्याची पात
१/२ टीस्पून व्हिनेगर
१ टीस्पून सोया सॉस

ड्रॅगन चिकन कृती

सर्वप्रथम आपल्याला चिकन मॅरीनेट करावे लागेल, यासाठी एका वाडग्यात सर्व साहित्य टाका आणि मिक्स करा. गुठळ्या राहणार नाहीत याची खात्री करा.

आता हे मॅरीनेट केलेले चिकन काहीवेळ बाजूला ठेऊन द्या. काही तासाने गॅसवर एक कढई ठेवून यात तेल गरम होण्यसाठी ठेऊन द्या.

तेल गरम झाले की यात मॅरीनेट केलेल्या चिकनचे एक एक स्ट्रिप्स (पट्ट्या) टाका आणि मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. यानंतर आता दुसरी कढई घ्या आणि यात तेल टाका.

यानंतर यात कांदा, सिमला मिरची घालून चांगले परतून घ्या. सर्व साहित्य नीट शिजले की मग यात व्हिनेगर, सोया सॉस, केचप आणि मीठ घाला आणि नीट मिक्स एकजीव करा.

आता एका एका वेगळ्या भांड्यात कॉर्नफ्लोअर आणि पाणी एकत्र करून एक मिश्रण तयार करा आणि हे कॉनफ्लोरचे पाणी कढाईत टाकून मिक्स करा.

हेही वाचा >> हिवाळा स्पेशल मिक्स भाजी; सर्वांना आवडणारी झटपट आणि मस्त रेसिपी नक्की ट्राय करा

सॉस घट्ट होईपर्यंत याला शिजवत ठेवा आणि मग शेवटी यात तळलेल्या चिकनच्या पट्ट्या आणि कांद्याची पात घालून नीट एकत्र करा. यानंतर गॅस बंद करा आणि गरमा गरम ड्रॅगन चिकन खाण्यासाठी सर्व्ह करा.