Soup Recipe: पावसाळ्याच्या दिवसात सतत काहीतरी गरमागरम खावसं वाटतं. बऱ्याचदा आपण कांदा भजी, बटाटा वडा आणि चहाचा आस्वाद घेतो. पण, प्रत्येकवेळी तेच तेच खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही टेस्टी आणि हेल्दी सूपचा आस्वाद घेऊ शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काळ्या हरभऱ्याचे सूप कसे बनवायचे हे सांगणार आहोत. जाणून घ्या साहित्य आणि कृती…
काळ्या हरभऱ्याचे सूप बनवण्यासाठी साहित्य:
१. २ कप काळे हरभरे उकडलेले
२. ३ कप काळ्या हरभऱ्याचे पाणी
३. दीड कप चिरलेले सोयाबीन
४. १ चमचा जिरे पूड
५. ४-५ पाकळ्या चिरलेला लसूण
६. १ आले बारीक चिरलेले
७. १ कप चिरलेले गाजर
८. १ कप चिरलेला टोमॅटो
९. चिमूटभर लाल तिखट
१०. चवीनुसार मीठ
११. २ चमचे तेल
काळ्या हरभऱ्याचे सूप बनवण्याची कृती:
१. सर्वप्रथम एका गरम पातेल्यात तेल ओतून लसूण घालून फोडणी द्या व त्यानंतर त्यात आलं घाला.
२. आता टोमॅटो सोडून सर्व भाज्या घाला व सर्व मसाले घालून हे मिश्रण परता.
३. यावेळी गॅस मंद आचेवर ठेवा.
४. त्यानंतर त्यात टोमॅटो घालून काळा हरभरा आणि त्याचे पाणी घाला.
हेही वाचा: मुलांनाही नक्की आवडेल चवदार अन् आरोग्यदायी बीटरूटची चटणी; लिहून घ्या साहित्य आणि कृती
५. आता हे मिश्रण पाच मिनिटे शिजवा.
६. तयार गरमागरम सूपचा आस्वाद घ्या.