तुम्हाला हेल्दी राहायाला आवडकतं का? मग तुमच्यासाठी आमच्याकडे उत्तम पर्याय आहे. तुम्हाला माहित असेल की खजूर आणि सोयाबीन आरोग्यासाठी किती फायेदशीर आहे. आज आम्ही तुम्हाला या दोन पदार्थांपासून तयार होणारी हेल्दी रेसिपी सांगणार आहोत ती म्हणजे सोया मिल्क आणि खजूर स्मुदी!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही रेसिपी हेल्दी असण्यासोबत झटपट तयार होते. सकाळी सकाळी ऑफिसच्या गडबडीत तुम्ही ही स्मुदी घेऊ शकता. तुमच्या शरीराला दिवसभर पुरेल अशी उर्जा तुम्हाला मिळेल. मुलांनाही ही स्मुदी नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊ या ही सोपी रेसिपी

सोया मिल्क आणि खजूर स्मुदी

साहित्य-

एक कप सोया मिल्क (अथवा लो फॅट दूध), एक मोठा चमचा प्रोटीन पावडर, अर्धे केळे, ४ मऊ खजूर (बिया काढून), एक चमचा व्हॅनिला इसेन्स, अर्धा कप योगर्ट

हेही वाचा – कुरकरीत, चटपटीत पोह्याचे कटलेट! मुलांच्या डब्यासह नाश्त्यासाठी झटपट करु शकता तयार, ही घ्या रेसिपी

कृती –

वरील सर्व पदार्थ एकत्र करून बारीक होईपर्यंत ब्लेंडरमधून काढा. आवश्यक वाटल्यास त्यात बदामाचे दूध घाला. त्यातील खजुराचे बारीक तुकडे अतिशय चवदार लागतात.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drink soy milk and dates smoothie and stay healthy ready in no time learn the recipe snk