Dudhi Bhoplyachi Ring Bhaji Recipe In Marathi:दुधी भोपळा असं नाव घेतलं तरी अनेक जण नाक मुरडतात. भोपळ्याची भाजी तर अनेकांना नकोच असते. पण भोपळा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. त्यामुळे त्याचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा असे सांगितले जाते. मग हिवाळ्याच्या दिवसांत गरमागरम आणि हेल्दी काहीतरी खायचं असेल तर दुधी भोपळ्याची खीर हा उत्तम पर्याय ठरु शकतो.
साहित्य
1/2 दुधी भोपळा
1 कप बेसन पीठ
1 टेबलस्पून तांदळाचे पीठ
1 टीस्पून धने पावडर
1/2 टीस्पून जीरे पावडर
1 टेबलस्पून लाल तिखट
1/4 टीस्पून हळद
१/८ टीस्पून हिंग
1/2 टीस्पून ओवा (आवडत असल्यास घालणे)
कृती
दुधी भोपळा सालून व धुऊन घ्या. सुरीने त्याचे मध्यम जाडसर आकाराचे,गोल काप करून घ्या. मध्यम आकाराच्या बाटलीचे टोपण घ्या. इथे हिंग डबीचे झाकण घेतले आहे.
एक गोल काप घेऊन त्याच्यामध्ये झाकण ठेवा व दाबून मधला गोल करून घ्या. अशाप्रकारे सर्व गोल रिंग्स तयार करून घेणे.
लाल तिखट व मीठ रिंग्सला लावून, चोळून बाजूला ठेवा. एका बाऊलमध्ये बेसन पीठ व तांदळाचे पीठ घ्या.
सर्व मसाले घालून घ्या. ओवा हाताने चोळून त्यात घाला. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घ्या.
गॅसवर कढईत तेल तापत ठेवा. भिजवलेल्या पिठात थोडी कोथिंबीर चिरून घाला. पीठ घट्ट वाटत असल्यास, एक टेबलस्पून पाणी घालून, हलवून घ्या. दोन-तीन रिंग पिठात बुडवून घ्या. पीठ व्यवस्थित निथळून घ्या.
पिठात बुडवून घ्या.नंतर तेलात सोडा. कढईत जेवढे मावतील, तेवढे घालून घ्या. दोन्ही बाजूने छान लालसर होईपर्यंत तळून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
अशाप्रकारे सर्व भजी तळून घेणे. टोमॅटो सॉस बरोबर किंवा नुसती खाल्ली तरी छान लागतात.