Sweet Potato kheer: श्रावणात अनेकांचे सोमवार आणि शनिवारी उपवास असतात. उपवासात आरोग्यदायी पदार्थ खाणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्ही रताळ्याची खीर नक्कीच ट्राय करू शकता. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
रताळ्याची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ रताळी
- २ चमचे तूप
- १/२ वाटी काजू, बदाम व मनुके
- ४ वाटी दूध
- १/२ वाटी गूळ
रताळ्याची खीर बनवण्याची कृती:
- सर्वात आधी रताळी उकडून, सोलून आणि किसून घ्यावी.
- त्यानंतर गरम कढईत तूप टाकून त्यात काजू, बदाम, मनुके लालसर होऊपर्यंत परतून बाजूला काढून ठेवा.
- याच तुपात रताळ्याचा कीस घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
- त्यानंतर त्यात दूध आणि गूळ घालून मिश्रण चांगले ढवळून घ्या.
- दुधाला एक उकळी आल्यावर त्यात काजू, बदाम, मनुके घाला.
- दुधाला पुन्हा एक उकळी आली की, गॅस बंद करून रताळ्याची खीर खाण्यासाठी सर्व्ह करा.
First published on: 16-08-2024 at 22:03 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During the fast of shravan make nutritious sweet potato kheer