दुधीची भाजी बहुतेक जणांना आवडत नाही, अशावेळी तुम्ही सकाळी नाश्त्याला दुधीचे थालपीठ करुन शकता. झटपट तयार होणारा हे पदार्थ आरोग्यासाठीही एकदम हेल्दी आहे. जो बनवतानाही तु्म्हाला जास्त त्रास घेण्याची गरज भासणार नाही. चला तर मग जाणून घेऊ चविष्ट सोप्या दुधीच्या थालीपीठाची रेसिपी..
दुधीचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती
साहित्य
१) किसलेला दुधी
२) ठेचलेली मिरची
३) जिरे
४) तांदूळ पीठ
५) बटर
६) ठेचलेली लसूण आणि आलं पेस्ट
७) चवीपुरते मीठ
दुधीचे थालिपीठ बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम दुधी चांगला धुवून स्वच्छ करुन त्याचा बारीक किस करा. यानंतर किसलेल्या दुधीमधून पाणी काढून घ्या. त्यात तांदूळ पीठ, मीठ, जिरे, मिरची, आलं, लसूण पेस्ट मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्या. त्यावर तेल लावून नीट पीठ तयार करा. त्यानंतर एका प्लास्टिकच्या कागदावर गोळे बनवून थालिपीठीप्रमाणे थापा.
आता तव्यावर बटर सोडून थालीपीठ भाजा. तुम्हाला हवं असल्यास, बटरच्या जागी तेलाचाही वापर करु शकता. पण बटर असेल तर त्याची चव अधिक चांगली लागते.