Paneer cutlets recipe: आपल्याकडे अनेकांचे सोमवार, मंगळवार, गुरुवार, संकष्टी आणि एकादशीला उपवास असतात. उपवास म्हटलं की, सर्रास साबुदाण्याची खिचडी बनवली जाते. पण, सतत साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही उपवासाचे पनीर कटलेट नक्कीच ट्राय करू शकता. आज आम्ही तुम्हाला ही रेसिपी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

पनीर कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

१. ३०० ग्रॅम पनीर
२. १ कप शिंगाड्याचे पीठ
३. ५-६ हिरव्या मिरच्या
४. १ चमचा लिंबाचा रस
५. १ वाटी कोथिंबीर
६. चवीप्रमाणे मीठ

पनीर कटलेट बनवण्याची कृती:

हेही वाचा: अशी बनवा ‘ओव्याच्या पानाची पौष्टिक भजी’; नोट करा साहित्य अन् कृती

१. सर्वात आधी पनीर व्यवस्थित किसून घ्या आणि त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.

२. त्यानंतर शिंगाड्याचे पीठ बारीक चाळणीने चाळून घ्या व त्यात किसलेले पनीर आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मिक्स करून घ्या.

३. आता त्यामध्ये लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

४. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्याचे कटलेट बनवून घ्या.

५. आता गरम तव्यावर तेल घालून कटलेट दोन्ही बाजूने खमंग परतून घ्या.

६. गरमा गरम उपवासाचे पनीर कटलेट दह्यासोबत सर्व्ह करा.