Easy Indo-Chinese Chapati Noodles Recipe : अनेकदा रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांच काय करावं असा प्रश्न गृहिणीना पडतो. अशा वेळी चपातीच्या न्युडल्स तयार करून हटके रेसिपी बनवू शकता. ही रेसिपी तयार करायला खूप सोपी आहे आणि ती चायनीज किंवा अगदी इंडो-चायनीज नूडल्स रेसिपीसारखीच बनवली जाते. आदल्या रात्रीच्या जेवणातून उरलेली कोणतीही रोटी संपवण्यासाठी हा एक परिपूर्ण नाश्ता आहे. लहान मुलं देखील हा नाश्ता आवडीने खातात.
चपाती नूडल्स (Chapati Noodles Recipe)
चपाती नूडल्स साहित्य: (Ingredients)
- ४ उरलेल्या चपात्या
- २-३ चमचे तेल
- ४-५लसूण पाकळ्या ठेचून
- १ चिरलेली हिरवी मिरची
- १ चिरलेला कांदा
- १ कप कोबीचे तुकडे
- १ कापलेली सिमला मिरची
- १/२ किसलेले गाजर
- २ टीस्पून आले-लसूण पेस्ट
- २ चमचे काश्मिरी लाल मिरची पेस्ट
- १ टेस्पून सोया सॉस
- १ टीस्पून चिली सॉस
- १ टीस्पून टोमॅटो केचप
- १ टीस्पून कॉर्नफ्लोअर
- पाणी
- १ टीस्पून साखर (पर्यायी)
- मीठ (चवीनुसार)
- १कप चिरलेल्या कांद्यांची पात (गार्निशसाठी)
चपाती नूडल्स कृती
- प्रथम चपाती नूडल सारख्या पाट्या तयार करा. त्यासाठी उरलेल्या चपात्या पातळ पट्ट्यामध्ये कापून घ्या (नूडल सारख्या) आणि बाजूला ठेवा.
- आता भाज्या परतून घ्या. त्यासाठी कढईत किंवा मोठ्या पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करा. त्यात ठेचलेला लसूण आणि चिरलेली हिरवी मिरची घाला आणि १ मिनिट परतून घ्या. त्यात चिरलेला कांदा, कोबी, शिमला मिरची आणि गाजर घाला. ५ मिनिटे परतून घ्या.
- आता त्यात मसाले आणि सॉस घाला. प्रथम आले-लसूण पेस्ट, काश्मिरी लाल मिरची पेस्ट, सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो केचप घाला आणि चांगले मिसळा. २ मिनिटे शिजवा.
- आता यात कॉर्नफ्लोर पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. कॉर्नफ्लोर पेस्ट आणि साखर (वापरत असल्यास) घाला. २ मिनिटे परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला.
- भाजीच्या मिश्रणात चपातीच्या पट्ट्या घाला. ५-७ मिनिटे किंवा चपातीच्या पट्ट्या टाका आणि एकत्र होईपर्यंत चांगले परता. आता चिरलेल्या कांद्याची पात टाकून सजवा.
हेही वाचा – कच्चा बटाटा आणि बेसनचा बनवा खमंग कुरकुरीत नाश्ता, तेही फक्त १० मिनिटांत, झटपट लिहून घ्या रेसिपी
गरमा गरम चपाती न्युडल्सवर ताव मारा.