Egg Noodles Recipe: व्हेज नूडल्स, चिकन नूडल्स नेहमीच आपण आवडीने खातो. पण सतत तेच-तेच पदार्थ खाऊन तुम्ही देखील कंटाळला असाल तर अंडा नूडल्स ही सोपी आणि टेस्टी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करु शकता. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे. चला तर मग जाणून घेऊया अंडा नूडल्सची सोपी रेसिपी…
अंडा नूडल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१. ३ बाऊल बॉईल नूडल्स
२. ३ अंडी
३. १ वाटी बारीक चिरलेला कांदा
४. १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
५. १ वाटी मटर
६. १ वाटी शिजवलेला फ्लॉवर
७. १ चमचा हळद
८. ३-४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
९. ३ चमचे बटर
१०. १ चमचा आलं-लसून पेस्ट
११. चवीनुसार मीठ
अंडा नूडल्स बनवण्याची कृती :
१. सर्वात आधी एका गरम कढईत बटर टाका.
२. त्यानंतर त्यात आलं-लसून पेस्ट, मिरची, कांदा, मटर, टोमॅटो व्यवस्थित परतून घ्या.
३. नंतर त्यात फ्लॉवर टाकून परतून घ्या.
४. आता त्यात हळद, मीठ टाकून परतून घ्या.
५. त्यानंतर त्यात अंडी फोडून टाका आणि हे मिश्रण परतून घ्या.
हेही वाचा: व्हेज ऑम्लेट खायचंय? मग नक्की ट्राय करा टेस्टी ‘रवा ऑम्लेट’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
६. २ मिनिटांनी त्यात उकडलेले नूडल्स टाका व पुन्हा हे सर्व मिश्रण चांगले परतून घ्या.
७. तयार गरमागरम अंडा नूडल्स सर्व्ह करा.