Easy Mithai Recipe : दिवाळी हा गोड पदार्थांचा सण असतो. यंदा दिवाळीत तुम्ही जर हटके आणि स्वादिष्ट मिठाई बनवण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत. फक्त २० रुपयांमध्ये तुम्ही घरच्या घरी स्वादिष्ट मिठाई बनवू शकता. ही मिठाई कशी बनवायची, चला तर सविस्तर जाणून घेऊ या.
साहित्य
मैदा
दूध पावडर
साखर
गुलाब पाणी
प्लास्टिक पेपर
तूप
पाणी
हेही वाचा : Kadai Paneer : असे बनवा ढाबा स्टाईल कढाई पनीर, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
कृती
सुरुवातीला एका कढईत तूप गरम करा
त्यात प्रमाणानुसार मैदा टाका आणि तूपात चांगला भाजून घ्या
त्यानंतर एका दुसऱ्या भांड्यात सारखेचा पाक तयार करावा.
हा साखरेचा पाक भाजलेल्या मैदात टाकावा आणि मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. नंतर हे मिश्रण कमी आचेवर ४ ते पाच मिनिटे शिजवून घ्यावे.
त्यानंतर त्यात दूध पावडर टाकावे आणि त्वरित गॅस बंद करावा.
दुध पावडर त्यात मिक्स करावे.
गॅस बंद केल्यानंतर तुम्ही सतत परतल्यामुळे याचा घट्ट गोळा तयार झालेला दिसेल.
त्यानंतर त्यावर गुलाब पाणी टाकावे.
एक प्लास्टिक पेपर घ्यावा आणि प्लास्टिक पेपरवर मिठाईचे मिश्रण टाकावे. या मिश्रणावर पुन्हा प्लास्टिक पेपर टाकावा.
त्यानंतर हे मिश्रण लाटावे आणि मिश्रणावरील प्लास्टिक पेपर काढावा
त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिठाईचा आकार बनवू शकता.
तुमची मिठाई तयार होईल.