Palak kabab recipe: महिलांना दररोज नाश्त्याला काय बनवायचे हा प्रश्न पडतो. त्याशिवाय सकाळचा नाश्ता जितका हेल्दी तितकाच गरजेचा असतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला पौष्टिक पालक कबाब कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग पाहू साहित्य आणि कृती…

पालक कबाब बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

  • १ जुडी पालक
  • २ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ३-४ वाटी बेसन
  • १ वाटी काजूचे तुकडे
  • १ वाटी दही
  • १ चमचा जिरे पूड
  • १ चमचा ओवा
  • २-३ चमचे बेसन
  • चिमूटभर हिंग
  • तेल आवश्यकतेनुसार
  • मीठ आवश्यकतेनुसार

पालक कबाब बनविण्याची कृती:

हेही वाचा: कोजागिरी पौर्णिमेला बनवा स्पेशल मखाणा बासुंदी; वाचा साहित्य आणि कृती

  • सर्वप्रथम एका भांडण्यात काजूचे तुकडे, जिरे पूड, हिंग व कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. पालक कबाबमधील स्टफिंग तयार करून घ्या.
  • आता एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि नंतर त्यात चिरलेला पालक टाकून, काही मिनिटे शिजवून घ्या.
  • आता त्यात बेसन, दही व मीठ टाकून, या मिश्रणाचे गोळे बनवा आणि त्यात तयार स्टफिंग भरा.
  • त्यानंतर गरम तेलात पालक कबाब शॅलो फ्राय करून घ्या.
  • तयार गरमागरम पालक कबाब सॉसबरोबर सर्व्ह करा.