Dudhi Masala Fry: दररोज डब्याला कोणती भाजी बनवायची असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. मुलांनाही त्याच-त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो; अशावेळी तुम्ही दुधी मसाला फ्रायची टेस्टी रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. आज आम्ही तुम्हाला ही रेसिपी कशी बनवायची हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ साहित्य आणि कृती
दुधी मसाला फ्राय बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २-३ दुधी
- १ वाटी तांदळाचे पीठ
- १ वाटी बेसन
- २ चमचे दही
- ४-५ कढीपत्त्याची पाने
- १ चमचा हळद
- २ चमचे लाल तिखट
- १ चमचा ओवा
- तेल आवश्यकतेनुसार
- मीठ आवश्यकतेनुसार
दुधी मसाला फ्राय बनवण्याची कृती:
हेही वाचा: चवदार आणि आरोग्यदायी पालक कबाबची सोपी रेसिपी; वाचा साहित्य आणि कृती..
- सर्वात आधी एका भांड्यात दही, हळद, लाल तिखट, मीठ आणि कढीपत्त्याची बारीक केलेली पाने, पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
- आता दुसऱ्या भांड्यात बेसन आणि तांदळाचे पीठ, हळद , लाल तिखट, मीठ घालून हे मिश्रण मिक्स करून बाजूला ठेवा.
- त्यानंतर दुधीची साल काढून त्याचे गोल आकारात काप करा.
- आता एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या.
- दुधीचे काप पहिल्यांदा बनवलेल्या मिश्रणात बुडवून त्यानंतर ते दुसऱ्या मिश्रणात घोळवा आणि गरम तेलात शॅलो फ्राय करून घ्या.
- आता गरमा गरम दुधीचे काप सॉसबरोबर सर्व्ह करा.