अलीकडेच महाराष्ट्रात पाऊस पडून गेला आता हळूहळू थंडीही पडेल. अशा वातावरणात अनेकदा गरमागरम क्रिस्पी, कुरकरीत असं काहीतरी खायचं मन करतं. पण नेहमी तेच तेच खाऊनसुद्धा कंटाळा येतो. नवीन गोष्टी ट्राय करायच्या म्हटल्या तर त्यात खूप वेळही जातो. पण आपण एक अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी झटपट तर तयार होतेच आणि क्रिस्पी, चवदारही होते. चला तर मग जाणून घेऊया क्रिस्पी ब्रेड रोलची रेसिपी.

साहित्य

४ ब्रेड

Elon Musk Giorgia Meloni dating rumours
एलॉन मस्क जॉर्जिया मेलोनीला ‘डेट’ करतायत? स्वतः मस्क यांनी व्हायरल फोटोवर दिली प्रतिक्रिया
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Instagram Love Affair Case
‘तो ‘इन्स्टा’वरच छान दिसत होता’, मुलीने मुलाला नाकारलं; चिडलेल्या मुलानं मग ‘तिचा’ तसला व्हिडीओ केला व्हायरल
How to Break a Wafer Packet: Viral Video Shows the Right Way
वेफर्सचे पॅकेट असे फोडावे, हे तुम्हाला वयाच्या कोणत्या वर्षी समजले?
Maggie Dosa Recipe | do you ever eat Maggie dosa
मॅगी डोसा कधी खाल्ला का? रेसिपी जाणून घेण्यासाठी मग एकदा हा व्हिडीओ पाहाच
Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”
chaturang transgender Berlin No Border Festival Gender discrimination Ideology
स्वीकार केव्हा होईल?
A heartwarming video of a woman selling flowers in heavy rain
“दुनिया में कितना गम है, मेरा गम सबसे कम है” धो धो पावसातील फुल विक्रेत्या महिलेचा Video व्हायरल

२ बटाटे (उकळून मॅश केलेले)

१ किसलेला कांदा

१ हिरवी मिरची

१ टीस्पून आले-लसून पेस्ट

१ टीस्पून लाल मिरची पावडर

१/२ टीस्पून मीठ

१/२ चमचा धणे पावडर

१/२ चमचा गरम मसाला

हेही वाचा… स्टार्टरचा नवीन प्रकार ट्राय करायचाय? मग आजच बनवा पनीर सॅंडविच पकोडा, वाचा साहित्य आणि कृती

हेही वाचा… वांग्याची नवीन रेसिपी ट्राय करायचीय? मग झटपट करा ‘भरलेल्या वांग्याचे रोल्स’, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती

कृती

१. ४ ब्रेड घ्या त्याच्या कडा कापून त्याचे बारीक बारीक तुकडे करा (Bread Crumbs) आणि एक भांड्यात ठेवून द्या.

२. त्यात २ उकळून मॅश केलेले बटाटे , १ चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेला हिरवी मिरची, १ चमचा आले-लसूण पेस्ट, १ चमचा लाल मिरची पावडर, १/२ चमचा मीठ, १/२ चमचा धणे पावडर आणि १/२ चमचा गरम मसाला घाला.

३. आता हे मिश्रण एकजीव करून घ्या.

४. आता या मिश्रणाचा वापर करून लहान लहान लांब असे रोल्स करून घ्या.

५. आता एक एक करून या रोल्सला ब्रेड क्रंब्सने कोट करा.

६. तेल गरम करून मध्यम आचेवर ठेवून हे रोल्स तेलात तळून घ्या.

७. केचअप किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा.

ही रेसिपी @khanaPeenaRecipes या युट्यूब चॅनलवरून घेण्यात आली आहे.