हिवाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात तुम्हाला तुमच्या आहारात पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामध्ये आवळ्याचा सुद्धा प्रामुख्याने समावेश असतो. हिवाळ्याच्या दिवसात आवळ्याचे सेवनदेखील फायदेशीर ठरू शकते. आवळा हे तुरट, आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे अत्यंत औषधी फळ आहे. त्यातच ट्रेनमध्ये मिळणाऱ्या आवळ्याच्या गोळ्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीच्या आहेत. तर आज आपण ‘आवळा गोळी’ घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी पाहू.

कृती :

soya chunks balls recipe in marathi
उद्याच्या नाश्त्यासाठी बनवा चवदार ‘सोया चंक्स बाॅल्स’, झटपट होणारी रेसिपी लिहून घ्या…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
How to make paratha
प्रत्येक वेळी पराठे लाटताना फुटतात? मग ट्राय करून बघा ‘या’ टिप्स…
Boondi curry recipe in Marathi how to make Boondi curry recipe
रोज काय भाजी करावी सुचत नाही? घरात असलेल्या बुंदीची करा “बूंदी करी”; झक्कास होईल बेत
rava besan ladoo recipe in marathi
अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘रवा बेसन लाडू’, रेसिपी लगेच लिहून घ्या
matar kachori recipe in marathi
कुरकुरीत खायची इच्छा होतेय? मग लगेच बनवा ‘मटार कचोरी’, सोपी रेसिपी लिहून घ्या
diy mosquito repellent
आता विसरा डासांचा त्रास! दिवसेंदिवस वाढणाऱ्या डासांचा ‘या’ सोप्या आणि स्वस्त घरगुती उपायांनी करा नायनाट
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
  • आवळे – अर्धा किलो
  • गूळ – पाव किलो
  • जिरेपूड – अर्धा चमचा
  • वेलचीपूड – चवीनुसार किंवा अर्धा चमचा
  • मीठ – अर्धा चमचा
  • काळ मिठ – अर्धा चमचा
  • सुंठ पावडर – एक चमचा
  • दालचिनी पावडर – अर्धा चमचा

हेही वाचा…Orange Barfi: नागपूरची प्रसिद्ध संत्र्याची बर्फी; आता घरच्या घरी होईल झटपट तयार… नोट करा रेसिपी

साहित्य :

  • सगळ्यात पहिला आवळे स्वच्छ धुवून घ्या.
  • कुकरमध्ये थोडं पाणी घाला आणि आवळे थोडे वाफवून घ्या.
  • मिश्रण थोडं थंड झाल्यावर त्यातील बिया काढून टाका व छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट करून घ्या.
  • पॅनमध्ये आवळ्याची पेस्ट व बारीक केलेला गूळ घालून पाच मिनिटे परतून घ्यावी.
  • हे मिश्रण सात ते आठ मिनिटे चांगले परतवून घ्या. मिश्रण एकजीव होत असताना त्यात जिरं, मीठ व वेलचीपूड, सुंठ पावडर, दालचिनी पावडर, काळ मिठ घालून मिक्स करून घ्या
  • मिश्रण पॅनला चिकटणं बंद झालं की, गॅस बंद करावा.
  • त्यानंतर हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करण्यास ठेवा.
  • नंतर एका छोट्या प्लेटमध्ये पिठीसाखर पसरवून घ्या व मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर हाताला पिठी साखर लावून हव्या तश्या लहान मोठ्या आकाराच्या गोळ्या बनवून घ्याव्या.
  • सर्व गोळ्या बनवून झाल्यानंतर पिठीसाखरेत त्या घोळवून घ्या व थोडा वेळ सुकण्यासाठी ठेवाव्यात.
  • नंतर या गोळ्या हवाबंद डब्यात भरून ठेवा.
  • अशाप्रकारे तुमच्या ‘आवळा गोळी’ तयार.

Story img Loader