Crispy Onion Rings Recipe: कित्येक जणांना संध्याकाळच्या चहासह काहीतरी चटपटीत खायला आवडते. तुम्हाला काहीतरी वेगळा पदार्थ खाऊन पाहायचा असेल तर तुम्ही ओनियन रिंग्स म्हणजेच कांद्याच्या रिंग्ज तयार करू शकता. अचानक पाहूणे आल्यास त्यांच्यासाठी झटपट हा पदार्थ तयार करू शकता. जर तुम्हाला देखील टेस्टी स्नॅक्स खाऊन पाहायचे असेल तर फॉलो करा किचन कुकिंग टीप्स
कांद्याच्या रिंग्ज/ओनियन रेसिपी
कांद्याच्या रिंग्ज/ ओनियन रिंग्ज बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
- २ मोठे कांदे (गोलाकार काप करून)
- २ कप मैदा
- १ टीस्पून लसूण पावडर
- १ टीस्पून ऑलिव्ह ऑईल
- १ टीस्पून दूध
- १ टीस्पून ओरेगॅनो
- १ टीस्पून काळी मिरी पावडर
- १/२ टीस्पून बेकिंग पावडर
- चवीनुसार मीठ
- अर्धा कप ब्रेडचा चुरा आणि पाणी
- तळण्यासाठी तेल
कांद्याच्या रिंग्ज/ ओनियन रिंग्ज कशी बनवावे –
कांद्याच्या रिंग्ज/ ओनियन रिंग्ज बनवण्यासाठी, प्रथम तळण्याचे तेल गरम करा. कांद्याचे गोलाकार काप आणि ब्रेडचे तुकडे वगळता सर्व साहित्य मिसळून जाडसर पीठ तयार करा. आता प्रत्येक रिंग कांद्याच्या कापांमधून वेगळे करा. पिठात रिंग बुडवून ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घोळून घ्या आणि गरम तेलात सोनेरी आणि कुरकुरीत