आवळ्याचे आरोग्यासाठी अमूल्य फायदे
आवळा हा आरोग्यासाठी अमृतासमान मानला जातो. व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि आयर्नचा समृद्ध स्रोत असलेल्या आवळ्याचा समावेश आहारात करणे अनेक आजारांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरते. पचनक्रिया सुधारणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, तसेच त्वचा व केसांसाठी फायदेशीर असणारा आवळा मधुमेह, हृदयविकार आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो. आवळ्याचा रस, मुरंबा किंवा लोणच्याच्या स्वरूपात तो सहज सेवन करता येतो.
आयुर्वेदात आवळ्याला विशेष महत्त्व असून नियमित आवळा सेवन केल्यास शरीराला चैतन्य मिळते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. आवळ्यांची चटणी ही भारतीय स्वयंपाकघरातील पोषणमूल्यांनी युक्त आणि चविष्ट पाककृतींपैकी एक आहे. हिवाळ्यात आवळ्याचा वापर आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे ही चटणी लोकप्रिय असते. ती सोपी, झटपट तयार होणारी आणि चवदार आहे.
हेही वाचा –तिखट अन् कुरकरीत लसूण शेव खायला आवडते का? मग या दिवाळीत ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
साहित्य:
- ताजे आवळे – ५-६
- हिरव्या मिरच्या – २-३
- लसूण पाकळ्या – २
- मीठ – चवीनुसार
- तेल – १ चमचा
- जिरे – १ चमचा
- मोहरी – १ चमचा
- खिसलेले खोबरे – एक वाटी
- पंढरपुरी डाळ – २ चमचे
- कडीपत्ता- फोडणीसाठी
हेही वाचा –सायंकाळच्या भुकेसाठी झटपट बनवा कुरकुरीत खाकरा चाट, लिहून घ्या स्ट्रीट स्टाइल चाट रेसिपी
कृती:
- १. आवळ्यांना बिया काढून छोटे तुकडे करा.
- २. एका मिक्सरच्या भांड्यात आवळ्याचे काप टाका.
- ३.त्यात जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर, पंढरपुरी डाळ, लसून आणि मीठ घालून चटणी वाटून घ्या.
- ४. आता फोडणीसाठी तेल गरम करा आणि त्यात कडीपत्ता आणि मोहरी टाका.
- ५. मोहरी तडतडल्यानंतर फोडणी चटणीवर टाका. तुमची आवळा चटणी तयार आहे.
हेही वाचा – मुंबई स्ट्रीट स्टाइल मसाला पाव, घरच्या घरी झटपट बनवा सोपी रेसिपी
ही आवळ्याची ब्रेड, चटणी गरम पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर चवदार लागते. ही चटणी शरीरासाठी आवश्यक असलेल्या जीवनसत्त्वे सी आणि इतर पोषणमूल्यांचा उत्तम स्रोत आहे. आपल्या दैनंदिन आहारात आवळ्याचा समावेश करण्याचा हा स्वादिष्ट मार्ग आहे.