Makhana Kheer: मखाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. मखाणा खाण्यास चविष्ट तर असतोच, शिवाय तो शरीरासाठीही फायदेशीर आहे. मखाण्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरसदेखील मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे यापासून विविध पदार्थदेखील बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला मखाण्याची खीर कशी बनवयाची हे सांगणार आहोत.

मखाण्याची खीर बनवण्यासाठी साहित्य:

१. २ कप मखणा
२. २ लिटर दूध
३. १ कप साखर
४. २ चमचे तूप
५. २ चमचे चारोळी
६. २ बारीक चमचे वेलची पूड
७. १ लहान काजू, बदाम बारीक चिरलेले
८. १ चमचे मनुके

मखाण्याची खीर बनवण्याची कृती:

१. सर्वात आधी मखाणे बारीक करून मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्या.

२. आता गॅसच्या मंद आचेवर तवा तापत ठेवून, तो तापल्यानंतर तूप टाका.

३. त्यानंतर तुपात मिक्सरमध्ये वाटलेले मखाणे एक मिनिट परतून घ्या.

४. दुसरीकडे दूध तापत ठेवा आणि दुधाला उकळी आली की त्यात हे मखाणे टाका.

५. दुधात मखाणे एकजीव होईपर्यंत मध्यम आचेवर दूध तापवा. परंतु, सतत दूध मोठ्या चमच्याने ढवळत राहा.

हेही वाचा: अवघ्या काही मिनिटांत बनवा टेस्टी ‘मसाला पुरी’, ही घ्या सोपी रेसिपी

६. आता त्यात साखर, काजू, बदाम, चारोळी, मनुका, वेलची पूड मिक्स करून घ्या.

७. साधारण पाच मिनिटांनी गॅस बंद करा.

८. तयार मखाणा खीरीचा आस्वाद घ्या.