दीपा पाटील
साहित्य
४ उकडलेली अंडी, २ चमचे आले-लसूण वाटलेले, १ वाटी कांद्याचे वाटण, १ वाटी टोमॅटोचा रस, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे वाटण, २ तमालपत्रे, १ चमचा गरम मसाला, २ चमचा तिखट, अर्धा चमचा धनेजिरे पावडर, अर्धी वाटी बेसन, २ चमचे खसखस आणि तिळाचे वाटण, १ वाटी तेल, मीठ चवीनुसार.
कृती
प्रथम अंडे सोलून सुरीने त्याचे दोन भाग करावेत. बेसनामध्ये मीठ घालून ते भज्याच्या पीठाप्रमाणे सरसरीत भिजवून घ्यावे. यात अंडे बुडवून ते चांगले तळून घ्यावे. आता एका पातेल्यात तेल गरम करून त्यात तमालपत्र, आले-लसूण वाटण, कांद्याचे वाटण, खसखस आणि तिळाचे वाटण, टोमॅटोचा रस आणि सर्व मसाले घालावेत. याला तेल सुटल्यावर खोबऱ्याचे वाटण घालावे. पाणी घालून मग उकळी आणावी आणि तळलेली अंडी त्यात घालून गॅस बंद करावा.