नीलेश लिमये nilesh@chefneel.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

४ कप चिकन स्टॉक / व्हेज स्टॉक, १ लहान वाटी बारीक चिरलेला कोबी, १ लहान वाटी बारीक चिरलेले गाजर, १ लहान वाटी बारीक चिरलेला पातीचा कांदा, १ चमचा बारीक चिरलेली लसूण, १ चमचा आले किसलेले, २ चमचे कॉर्न स्टार्च/ भाताची पेज, १ चमचा सोया सॉस, २ अंडी (फेटलेली), १०० ग्रॅम बोनलेस चिकन (बारीक चिरलेले), २ चमचे तेल,मीठ- मिरपूड चवीकरिता

कृती :

एका भांडय़ात तेल गरम करा. त्यात कांदा, आलं, लसूण, चिकन परतून घ्या. त्यातच कोबी, गाजर, पातीचा कांदा घाला. अवसडून परतून घ्या. त्यात व्हेज स्टॉक किंवा चिकन स्टॉक घाला आणि त्याला एक उकळी काढा. आता यात सोया सॉस आणि चवीनुसार मीठ, मिरपूड घाला. या सुपाला दाटपणा येण्यासाठी त्यात भाताची पेज घाला किंवा कॉर्न स्टार्च घालू शकता. पुन्हा उकळी येऊ द्या. उकळताना एका गाळण्यातून फेटलेले अंडे यात एकत्र करा. आता सूप चांगले ढवळून घ्या. यामुळे अंडय़ाच्या छान पाकळ्या पडतील. हेच या सुपाचे वैशिष्टय़ही आहे. मस्त गरमागरम सूप पिताना सोबत चिली सॉस किंवा व्हिनेगर मिक्स करा.

बरेचदा आपण चिनी पदार्थ बनवताना कॉर्न स्टार्चचा उपयोग करतो पण त्याऐवजी भाताची पेज वापरली तर ते अधिक उपयुक्त होईल.