साहित्य

४ वाटय़ा नारळाचे दूध, ४ अंडी, १ चमचा धने-जिरे पूड, १ चमचा काळी मिरी पूड. १ चमचा हळद, २-३ चमचे तांदुळाचे पीठ, २-३ चमचे आले-लसूण-मिरचीचे वाटण, मीठ, कोथिंबीर.

कृती

अंडी सोडून बाकीचे जिन्नस नारळाच्या दुधात घालून घ्या. आता याला मंद गॅसवर उकळी येऊ द्या. त्यानंतर एकेक अंडे फोडून त्यात टाका आणि शिजू द्या. वरून कोथिंबीर घाला.

Story img Loader