Egg Korma Recipe: दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात नेमकं स्पेशल असं काय बनवायचं प्रश्न अनेकदा पडतो. तेव्हा आई झटपट अंड्याचं ऑमलेट किंवा भुर्जी बनवते. पण सतत अंड्याचं ऑमलेट, अंड्याची भुर्जी खाऊन कंटाळा येतो.

आज आपण एक खास पदार्थ पाहणार आहोत ज्याचं नाव ऐकताच नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल . ज्याचे नाव आहे ‘अंडा कोरमा’ . तर ‘अंडा कोरमा रेसिपी’ नक्की कशी बनवायची आणि अगदी कमी वेळात ही रेसिपी झटपण पण झणझणीत आणि चविष्ट कशी होईल हे आपण आज जाणून घेणार आहोत.

Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Ragi Biscuits recipe
मैद्याचे बिस्किट सोडा मुलांसाठी घरीच बनवा पौष्टिक नाचणीचे बिस्कीट; वाचा साहित्य आणि रेसिपी
Gajar Rabdi Recipe,
थंडीच्या दिवसात बनवा गरमागरम ‘गाजर रबडी’, रेसिपी वाचूनच तोंडाला सुटेल पाणी, लिहून घ्या सोपी साहित्य आणि कृती
paneer bhaji recipe
या थंडीत बटाटा आणि कांदा भाजी खाऊन कंटाळलात? मग पनीरची ही नवीकोरी रेसिपी करा ट्राय
Kairiche Lonche recipe,
१५ मिनिटांत ‘कैरीचं लोणचं’ बनवायचंय? मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे, लगेच वाचा साहित्य आणि कृती
Khari Biscuit Recipe:
Video : घरच्या घरी बनवा चहाबरोबर खायला आवडणारी खारी! ही सोपी रेसिपी एकदा पाहाच
besan cheese toast recipe
सकाळी झटपट नाश्ता बनवायचाय? मग एक वाटी बेसनापासून बनवा ‘ही’ सोपी रेसिपी

हेही वाचा… Crispy Potato Shorts Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा ‘क्रिस्पी पोटॅटो शॉर्ट्स’, लगेच लिहून घ्या रेसिपी

साहित्य

४ चिरलेले कांदे

१ कप दही

काजू

४ अंडी

तेल

खडे मसाले

आलं-लसूण पेस्ट

टोमॅटो प्यूरी

मीठ

१/२ चमचा कश्मीरी लाल मिरची

१/२ चमचा गरम मसाला

१/२ चमचा कोथिंबीर पावडर

हेही वाचा…संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा ‘क्रिस्पी चिली गार्लिक बाईट्स’; लहान मुलंही आवडीने खातील

कृती

  1. एका पातेल्यात ४ चिरलेले कांदे सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
  2. मिक्समध्ये तळलेले कांदे, १ कप दही आणि काही काजू घाला.
  3. सगळं मिश्रण चांगलं बारीक करून घ्या.
  4. ४ अंडी चांगली भाजून घ्या.
  5. एका पातेल्यात २ चमचे तेल, काही खडे मसाले, आलं-लसूण पेस्ट आणि टोमॅटो प्यूरी घाला. २ मिनिटं शिजवा.
  6. त्यात १/२ चमचे मीठ, १ चमचा कश्मीरी लाल मिरची, १/२ चमचा हळद पावडर, १/२ चमचा गरम मसाला आणि १/२ चमचा कोथिंबीर पावडर घाला. सगळे मसाले आणि ग्रेवी छान परता.
  7. नंतर कांदा, दही आणि काजूची पेस्ट घाला आणि चांगलं शिजवा.
  8. ग्रेवीची सुसंगती सुधारण्यासाठी थोडं पाणी घाला.
  9. त्यात भाजलेली अंडी आणि कोथिंबीर घाला.
  10. तुमची स्वादिष्ट अंड्याचा कोरमा तयार आहे. आनंद घ्या!

हेही वाचा… Dahi Kabab Recipe: अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘दही कबाब’, चवदार रेसिपी लगेच लिहून घ्या

पाहा VIDEO

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.

Story img Loader