आज आम्ही तुम्हाला झणजणीत आणि चटकदार अशी रेसिपी सांगणार आहोत. शिवाय या रेसिपीसाठी लागणारा हिरवे टोमॅटो बाजारात कधीही आणि अगदी सहज उपलब्ध होऊ शकतो. लाल टोमॅटोची जशी एक वेगळीच चव असते, तशी हिरव्या टोमॅटोलाही एक विशिष्ठ अशी चव आहे. कच्च्या टोमॅटोची चवदार भाजी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल पण आता या टोमॅटोची थोडीशी वेगळी रेसिपी तुम्हला आज सांगणार आहोत. ती म्हणजे कच्च्या म्हणजेच हिरव्या टोमॅटोंची झणझणीत चटणी. हिरव्या टोमॅटोंच्या चटणीसाठी तुम्हाला लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे –
साहित्य –
हिरव्या टोमॅटोंची चटणीसाठी ४ ते ५ हिरवे टोमॅटो बाजारातून किंवा तुमच्या शेतात उपलब्ध असतील तर तेथून आणा. त्यासोबत ३-४ हिरव्या मिरच्या, शेंगदाणे पाव कप, लसणाच्या १०-१२ पाकळ्या, जिरे अर्धा चमचा, गूळ एक चमचा आणि मीठ चवीनुसार घ्या.
हेही वाचा- मऊ लुसलुशीत पराठा खायला तुम्हालाही आवडतो? तर मलबार पराठ्याची ही सोपी रेसिपी एकदा जाणून घ्याच
कृती –
वरील साहित्य घेतल्यानंतर चटणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा.
हिरव्या टोमॅटोचे मोठे तुकडे करून घ्या ते तुकडे पॅनमध्ये थोड्या तेलावर टोमॅटो, जिरे, लसूण, शेंगदाणे, मिरच्या घालून परतून घ्या. ते सर्व थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये हे मिश्रण घालून त्यात मीठ, कोथिंबीर आणि गूळ घालून चांगलं बारीक करून घ्या. त्यानंतर फोडणीच्या भांड्यात तेल तापवून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, अर्धा चमचा उडीद डाळ, दोन बेडगी मिरची घालून त्याची फोडणी करा आणि ती चटणीवर घाला.
हेही वाचा- तांदळाची भाकरी खाऊन कंटाळा आलाय? तर आता बनवा तांदळाचे खमंग थालीपीठ, पाहा रेसिपी
टोमॅटोच्या चटणीचा उपयोग आणि फायदे –
टोमॅटो हा मुळात आंबट असून त्याची चटणी करून त्या प्रमाणातच सेवन केल्यानं तोंडाची चव वाढते. शिवाय या चटणीमुळे भूक वाढवायलाही मदत होते.