(Tomato Chaat Recipe): जर तुम्हाला चाट खाण्याची आवड असेल आणि तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यात विविध प्रकारचे चाट खायला आवडत असतील तर तुम्ही बनारसची प्रसिद्ध टोमॅटो चाट खाऊन पाहू शकता. तुम्ही आलू टिक्की, पापडी आणि पुचका चाट तर खूप वेळा खाल्ले असेल, पण यावेळी बनारसची प्रसिद्ध टोमॅटो चाट खाऊन पाहा. विशेष म्हणजे हे चाट तुम्ही घरीच सहत तयार करू शकता. तुम्हाला चटपटीत टोमॅटो चाट खाऊन तुम्हाला नक्की आवडेल. मग वाट कसली पाहताय जाणून घ्या रेसिपी
टमाटर चाट रेसिपी
टोमॅटो चाटसाठी साहित्य
- ४ चिरलेला टोमॅटो
- १/२ कप उकडलेले पांढरे वाटाणे
- एक उकडलेला बटाटा
- एक चिरलेला कांदा
- १ टीस्पून आले बारीक चिरून
- ३ ते ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- एक चमचा लिंबाचा रस
- १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
- १/२ टीस्पून काळे मीठ
- १ टीस्पून जिरे पावडर
- १/२ टीस्पून गरम मसाला
- १ चमचा (चवीनुसार) चिंचेची चटणी
- १/२ टीस्पून (चवीनुसार) कोथिंबीर चटणी
- चवीनुसार मीठ
- ४ चमचे तेल किंवा तूप
हेही वाचा – विदर्भ स्पेशल खमंग पौष्टिक मेथीचे आळण असे बनवा घरी, ही सोपी रेसिपी जाणून घ्या
टोमॅटो चाट कृती
टोमॅटो चाट बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये तीन चमचे तेल गरम करा. त्यात आले, हिरवी मिरची आणि कांदे घालून कांदे गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. आता टोमॅटो आणि १/२ टीस्पून मीठ घालून मंद आचेवर पाच मिनिटे शिजवा. नंतर त्यात गरम मसाला, काश्मिरी लाल मिरची पावडर, जिरेपूड टाकून मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. आता त्यात बटाटे घालून दोन मिनिटे परतून घ्या. यानंतर उकडलेले वाटाणे, अर्धा कप पाणी घालून मंद आचेवर दोन मिनिटे शिजवा. यानंतर हिरवी चटणी, आंबट गोड चटणी, हिरवी धणे आणि चवीनुसार काळे मीठ घालून गॅस बंद करा. आता तयार केलेले साहित्य प्लेटमध्ये ठेवा, नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि हिरवी कोथिंबीर घाला आणि गरम सर्व्ह करा.